Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PLANET MARATHI : SOPPA NASAT KAHI - एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत ?

Webdunia
सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (20:20 IST)
काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे 'पॉलीअमॉरी'. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु 'पॉलीअमॉरी' संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. कारण भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच नवरे होते. त्यामुळे ही संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. याच 'पॉलीअमॉरी' संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मयुरेश जोशी दिग्दर्शित 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 
नुकताच 'सोप्पं नसतं काही' चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील. 
 
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणाऱ्या 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' या वेबसिरीजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे हा एक वेगळा विषयीही ते नक्कीच स्वीकारतील. आपली  कला, संस्कृती, साहित्य यांना आधुनिकतेची जोड देत ती सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, नाविन्यपूर्ण व दर्जेदार कंटेन्ट देणे, ही आमची जबाबदारी आहे. 'सोप्पं नसतं काही' हा त्याचाच एक भाग आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतील याची खात्री आहे.''
    
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ३१ ऑगस्टपासून 'सोप्पं नसतं काही' ही वेबसिरीज प्रेक्षकांना अतिशय अल्प दरात पाहता येईल.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments