suvichar

'देवा' मध्ये प्रेक्षकांना भेटणार 'आई'

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (11:13 IST)
रीमा लागू यांच्या आठवणीला उजाळा 
 
मराठी रंगभूमीवरील प्रभात नायिका, आणि बॉलीवूडची 'आई' अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची झलक लवकरच 'देवा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स  आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा.. एक अतरंगी' या सिनेमात त्यांची विशेष भूमिका असून, रीमा लागू यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या पच्छात प्रदर्शित होणारा हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. मराठी आणि हिंदीच्या छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर अनेक दशके राज्य करणाऱ्या रीमा लागू यांचे नाव अभिनयजगतात आजही मोठ्या स्थानावर आहे. 
 
बॉलीवूड सुपरस्टारच्या आईची भूमिका करत, रीमा लागू यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवली. आपल्या मुलांना संस्काराचे महत्त्व समजवणारी प्रेमळ आई साकारताना दुसरीकडे मुलाला शिक्षा करणारी त्यांच्यातली कणखर आईसुद्धा लोकांना हवीहवीशी वाटली. हीच आई आता 'देवा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येत आहे. यापूर्वी 'आईशप्पथ' आणि 'संशयकल्लोळ' या सिनेमातून अंकुश आणि रीमा यांनी एकत्र काम केले असल्यामुळे, 'देवा' सिनेमातील त्यांची भूमिका चांगलीच रंगात आलेली दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रीमा यांची छोटी झलक आपल्याला पाहायला मिळते. उद्दात्त मातृत्व असलेल्या या अभिनेत्रीची ही झलक 'देवा'च्या ट्रेलरला अधिक महत्व प्राप्त करून देते. त्यामुळे या माउलीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची तीव्र इच्छा प्रेक्षकांना झाली असून, 'देवा' च्या निमित्ताने लवकरच ह्या 'आई' ची झलक पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 
 
मुरली नलप्पा दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असून, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, डॉ. मोहन जोशी, मयूर पवार, पंढरीनाथ कांबळे यांची देखील भूमिका आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट, 'मायसा' मधील तिचा आकर्षक लूक समोर आला

राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक टीझर 'बिग बॉस मराठी' सोबत राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रदर्शित होईल

मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि जिंगल किंग विनय मांडके यांचे निधन

रामायण चित्रपटातील कलाकारांचे मानधन: रणबीर कपूरचे मानधन १५० कोटी रुपये, साई पल्लवीचे मानधन १२ कोटी रुपये

सौंदर्य आणि अप्रतिम कोरीव कामासाठी जगभरात प्रसिद्ध प्रेम मंदिर वृंदावन

पुढील लेख
Show comments