Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (21:25 IST)
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल ठरत आहे. मुंबई, पुणे यांसह सर्वच शहरात हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही ब्रेक करताना दिसत आहे.
 
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटान प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात इतकी कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड या चित्रपटाने ५.७० कोटींची कमाई एका दिवसात केली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड सैराटच्या नावे होता. तर या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खान अयान अग्निहोत्रीच्या 'यू आर माईन' या नवीन गाण्यात रॅप करणार, टीझर रिलीज

बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसूझाला फसवणूक प्रकरण रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

अक्षय कुमारने सॅनिटरी पॅड घातले होते

Mardaani 3 मर्दानीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशराजची मोठी घोषणा, राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी 3' मध्ये दिसणार

सर्व पहा

नवीन

Emergency: इमर्जन्सी' चित्रपटाचे पहिले गाणे सिंहासन खाली करो रिलीझ

कंगना रणौतला जिवे मारण्याची धमकी,पोलिसांची मदत मागितली

गोलकोंडा किल्ला हैद्राबाद

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

भारतात जन्माष्टमीला भेट देण्यासारखी ठिकाणे

पुढील लेख
Show comments