Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

U TURN : बदामाच्या शिऱ्याने' 'यु टर्न'ची सुरुवात

Webdunia
शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:54 IST)
नवरा बायको म्हटलं की, प्रेम आणि रुसवे फुगवे हे आलेच. अशाच नवरा बायकोच्या जीवनावर आधारित 'यु टर्न' ही वेबसिरीज  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग  प्रदर्शित झाला. पहिल्याच भागामध्ये मुक्ता आणि आदित्य घटस्फोट घेण्यासाठी वकिलांसमोर बसून घटस्फोट घेण्याची कारणे देत आहे. मुक्ता आणि आदित्य जरी भांडत असले तरी त्यांच्या भांडणातूनही एकमेकांबद्दल असलेले प्रेम, काळजी व्यक्त होते आहे. असं म्हणतात, लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचे असते. मग घटस्फोट पण दोन कुटुंबांचा असतो का? याच प्रश्नाचे सुंदर उत्तर मुक्ता या भागातून देताना दिसत आहे. घटस्फोट होत असून सुद्धा सासरच्या लोकांसोबत अतिशय सुंदर नातं मुक्ताचे आहे. मात्र घटस्फोट घेत असल्यामुळे एक प्रकारचा पेच मुक्ता आणि तिच्या सासरच्या लोकांमध्ये निर्माण झालेला दिसतो.. स्वइच्छेने घटस्फोट घेत असूनही आदित्य आणि मुक्ताच्या मनात एक वेगळीच चलबिचल सुरु आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर दुसऱ्या भागात काय होणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे आणि पुढच्या भागासाठी येत्या मंगळवारपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. राजश्री मराठीच्या युट्यूब चॅनेलवर 'यु टर्न' ही वेबसिरीज आपल्याला बघता येणार आहे. या वेबसिरीजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे. मयुरेश जोशी यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले असून नेहा बडजात्या यांनी निर्मिती केली आहे. ही वेबसिरीज दर मंगळवारी दुपारी १;३० वाजता राजश्री मराठी या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

पुढील लेख
Show comments