Dharma Sangrah

ग्लेन मॅक्सवेलने भारतीय तरुणीसोबत दुसर्‍यांदा केला साखरपुडा

Webdunia
सोमवार, 16 मार्च 2020 (15:26 IST)
आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल या फलंदाजाने भारतीय तरुणीशी साखरपुडा केला आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूने दुसर्‍यांदा हा साखरपुडा केला आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपली भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत भारतीय पद्धतीनुसार दुसर्‍यांदा साखरपुडा केला. याआधी 27 फेब्रुवारी रोजी त्याने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत, साखरपुडा केला होता. आता त्याने भारतीय पद्धतीने विनीसोबत पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे.
 
मॅक्सवेलची गर्लफ्रेंड विनी रमनने तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मॅक्सवेलन कुर्ता तर विनीने लेहेंगा परिधान केला आहे. मॅक्सवेलचा हा देसी अवतार भारतीय  चाहत्यांना चांगला आवडला आहे.
 
याआधी मॅक्सवेलने मानसिक स्वास्थमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळी त्याने, माझी जोडीदार विनीने मला सल्ला दिला की मी कोणाशी तरी बोलावे. माझा मानसिक ताणतणाव ओळखणारी ती पहिली व्यक्ती होती. मी खरे तर तिचे आभार मानले पाहिजेत, असे सांगितले होते. मॅक्सवेल आणि विनी 2 वर्षांपासून एकत्र आहेत, मॅक्सवेलच्या प्रत्येक कठीणप्रसंगी विनी त्याच्यासोबत होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

ऋषभ पंतने LSG च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; फ्रँचायझीची प्रतिक्रिया

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

GT vs RR : दुसरा अंतिम सामना कोणता संघ जिंकणार, गुजरात आणि राजस्थान भिडणार

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

पुढील लेख
Show comments