Dharma Sangrah

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (16:00 IST)
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना पक्ष्यांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचे सावट आहे. बर्ड फ्लूचे संकट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. असे असताना धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्याने त्याच्यावर कारवाईची शक्यता  आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोनंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, धवनवर कारवाई होऊ शकते. प्रशासन यावर गंभीर  विचार करत आहे.
 
धवन वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्याने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसेच गंगा आरतीही केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

भारतीय संघ जून महिन्यात सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

MI vs RR : राजस्थान रॉयल्सने मुंबईला ३० धावांनी हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला; पंजाब-KKR स्पर्धेतून बाहेर

सामन्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय खेळाडूचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन

दिल्ली कॅपिटल्सने ईडन गार्डन्सवर केकेआरला ४० धावांनी पराभूत करून सामना जिंकला

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

पुढील लेख
Show comments