Marathi Biodata Maker

IND vs IRE T20 :भारताचा आयर्लंडवर विजय

Webdunia
सोमवार, 27 जून 2022 (10:13 IST)
भारतीय संघाने डब्लिन इथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत आयर्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे ही लढत 12-12 षटकांची खेळवण्यात आली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 108 धावांची मजल मारली. हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावांची खेळी केली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, अवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना दीपक हुड्डाच्या 47 धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह भारतीय संघाने 2 ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
 
भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करत आहे. चहलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. हार्दिक पंड्याने या सामन्याद्वारे कर्णधार भूमिकेत तर उम्रान मलिकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबई इंडियन्सने पंजाबकिंग्सला ६ गडी राखून पराभूत केले

CSK vs LSG : आजचा आयपीएल सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार

PBKS vs MI: आजचा सामना कोण जिंकणार? पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज धरमशाला स्टेडियमवर आमनेसामने येतील

RCB vs KKR: आरसीबीने केकेआरला ६ गडी राखून पराभूत केले, विराट कोहलीने शानदार शतक झळकावले

GT vs SRH: हैदराबादचा संघ ८६ धावांवर सर्वबाद, गुजरातने दणदणीत विजयासह अव्वल स्थान पटकावले

पुढील लेख
Show comments