Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत विरुद्ध श्रीलंकाः पहिल्या एकदिवसीय सामन्यात असे काही घडू शकते, भारताच्या XI मध्ये ,संजू सॅमसनचे पदार्पण जवळजवळ निश्चित आहे

Webdunia
रविवार, 18 जुलै 2021 (13:50 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 18 जुलै (रविवारी) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ विजयासह या दौर्‍याची सुरूवात करू इच्छित आहे. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या या खेळाडूंना या मालिकेत स्वत: ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असेल.पहिल्या सामन्यात युवा खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार धवन कोणत्या संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. श्रीलंकेच्या खेळपट्टीवर धवन तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतात जे फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त मानले जातात. 
 
पृथ्वी शॉ धवनबरोबर सुरुवात करू शकतात 
 
कर्णधार शिखर धवन आणि तीन मुख्य सलामीवीर फलंदाजांसह टीम इंडिया श्रीलंकेच्या या दौर्‍यावर आली आहे. धवनसह पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी कोण डाव सलामीला येईल हे पाहणे उत्सूकतेचे  ठरणार आहे. मात्र, पृथ्वी शॉ बहुधा दिसणार. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलसाठी खेळताना शॉने गब्बरबरोबरही सलामी दिली आहे आणि या दोघांमध्ये चांगला तालमेल आहे.अशा परिस्थितीत पडिक्कल आणि गायकवाड यांना त्यांच्या क्रमांकाची प्रतीक्षा करावी लागेल.
 
संजू सॅमसनचे पदार्पण जवळजवळ निश्चित आहे
 
सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत असल्याचे  समजले जात आहे  आणि अपेक्षेप्रमाणे ते  तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतील. त्याचबरोबर संजू सॅमसन वन डे मालिकेच्या पहिल्या सामन्यात डेब्यू करू शकतात. केरळच्या फलंदाजाकडे खूप अनुभव आहे आणि किमान एकदिवसीय सामन्यात इशान किशनपेक्षा त्याला जास्त पसंती दिली जाईल. संजू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकेल. त्याचबरोबर मनीष पांडे पाचव्या क्रमांकावर खेळण्याचीही शक्यता आहे. 
 
पंड्या ब्रदर्सवर मोठी जबाबदारी असेल
 
धवनला हार्दिक आणि क्रुणाल पांड्या दोघांसोबत जायला आवडेल. श्रीलंकेच्या खेळपट्टीवर नजर टाकल्यास, क्रुणाल येथे प्रभावी सिद्ध होऊ शकतो आणि त्याचवेळी शेवटच्या षटकात ते फलंदाजी करण्यातही तज्ज्ञ आहे. त्याचबरोबर या संपूर्ण दौर्‍यावर हार्दिकचीही मोठी जबाबदारी असणार आहे. या मालिकेत हार्दिक गोलंदाजी करतानाही दिसू शकतील, असा विश्वास आहे. हार्दिक तंदुरुस्तीच्या संदर्भात बर्‍याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे .ह्याचे उत्तर ते टीकाकारांना दमदार कामगिरीने देऊ शकतील.
 
धवन कुल्चाच्या जोडीवर विश्वास दाखवणार 
 
या वनडे मालिकेत शिखर धवन कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या जोडीवर विसंबून राहू शकेल. श्रीलंकेच्या कमकुवत फलंदाजीचा फायदा आणि फिरकीपटूंसाठी उपयुक्त खेळपट्टीचा फायदा कुल्चाची जोडी घेऊ शकते. धवनकडे वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहरच्या रूपात आणखी दोन पर्याय आहेत. वेगवान गोलंदाजीत दीपक चहर उपकर्णधार भुवनेश्वर कुमार सोबत दिसू शकतील. नवदीप सैनी आणि चेतन सकारिया यांना आता प्रतीक्षा करावी लागू शकते.
 
भारताचा संभाव्य प्लेइंग XI: शिखर धवन (कर्णधार) पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन,मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पाच महिला खेळाडूंचा कराचीत सुटका, सांघिक हॉटेलला आग

पुढील लेख
Show comments