मैदानावर एखादा सामना जिंकल्यानंतर जल्लोष करताना खेळाडू डान्स करत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडीजचे खेळाडू असा डान्स करतात. भारतीय संघात देखील युवराज सिंग, हरभजन सिंग, विराट कोहली आणि शिखर धवन हे डान्स करताना तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एका भारतीय महिला क्रिकेटपटूचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मडियावर सुरू झाली आहे.
भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने, लॉकडाउन मूव्हज असे असू शकतात, असे म्हटले आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर वेदाच्या डान्सचे सर्वजण कौतुक करत आहेत. देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू घरातून चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क करत आहेत.