Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kevin O’Brien Retirement: विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूची निवृत्ती

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (13:53 IST)
आयर्लंडचा स्फोटक फलंदाज केविन ओब्रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 2006 मध्ये आयर्लंडसाठी पहिला सामना खेळला आणि त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. त्याने इंग्लंडविरुद्ध दोनदा शतक झळकावले आणि आयर्लंडसाठी पहिले कसोटी शतक झळकावण्याचा बहुमानही त्याच्याकडे आहे. आयर्लंडला सहयोगी देशाकडून कसोटी खेळणाऱ्या देशाचा दर्जा मिळवून देण्यात केविन ओब्रायन यांचाही मोठा वाटा आहे. त्याच्या नावावर अनेक खास रेकॉर्ड आहेत. 
 
केविन ओब्रायन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयर्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.68 च्या सरासरीने आणि 5.20 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 114 बळी घेतले आहेत. विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज आहे. 2011 च्या विश्वचषकात बंगळुरूच्या मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध तुफानी खेळी खेळली आणि अवघ्या 50 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर आयर्लंडने मोठा अपसेट करत सामना जिंकला. 
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments