Festival Posters

IPL 2023 साठी MS धोनी पुन्हा एक्शन मोड मध्ये

Webdunia
शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (12:49 IST)
या सीझनमध्ये आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे.त्याच्या नेतृत्वाखाली संघाला आणखी एक विजेतेपद मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. आयपीएलच्या मिनी लिलावात चेन्नईने बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूला विकत घेऊन आपला संघ आणखी मजबूत करण्याचे काम केले आहे.क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनीने बॅट उचलली असून आयपीएलच्या स्पर्धेसाठी सराव सुरु  केला असून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये धमाल करताना दिसणार आहे. धोनीच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी नेटवर सराव करताना दिसत आहे.धोनीची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. अशा परिस्थितीत या सर्व चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळणार आहे.

धोनीने चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या वर्षी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते.त्यावेळी चेन्नईची धुरा रवींद्र जडेजाने सांभाळली 
 
आयपीएल 2023 साठी चेन्नई संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ - एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, काइल जेम्सन, निशांत सिंधू, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, सिमर देशपांडे, दीपक चहर, प्रशांत सोळंकी, महेश तिक्ष्णा.
 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

CSK vs SRH:हैदराबादचा प्रभावी विजय, चेन्नई सुपर किंग्सला ५ गडी राखून पराभूत केले

PBKS vs RCB : आरसीबीने पंजाब किंग्सला २३ धावांनी हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवला

DC vs RR : दिल्लीने राजस्थानवर पाच गडी राखून विजय मिळवला

KKR vs GT: केकेआरने गुजरात टायटन्सवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला

KKR vs GT : आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार

पुढील लेख
Show comments