Marathi Biodata Maker

राहुल द्रविड टीम इंडियाचे कोच होणार?

Webdunia
गुरूवार, 20 मे 2021 (17:54 IST)
तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी आदर्श मानले जाणारे, टीम इंडियाची अभेद्य अशी द वॉल, निवृत्तीनंतर युवा खेळाडूंना घडवण्यात मोलाचं योगदान देणारे माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी असण्याची चिन्हं आहेत.
 
गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हांब्रे यांचं नाव चर्चेत आहे. म्हांब्रे गेली काही वर्ष द्रविड यांच्या प्रशिक्षक चमूचा भाग आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून संजय बांगर, प्रवीण अमरे, डब्ल्यू.एस.रमण यांची नावंही चर्चेत आहेत.
 
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. सर्व प्रमुख खेळाडू या संघाचा भाग आहेत. याच काळात पर्यायी भारतीय संघ वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे.
 
मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडमध्ये असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची आवश्यकता आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.
 
द्रविड हे सध्या बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. याआधी त्यांनी भारतीय U19 संघ तसंच भारतीय अ संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटवताना दिसत आहेत.
 
164 टेस्ट आणि 344 वनडेंचा प्रदीर्घ अनुभव आणि दोन्ही प्रकारात 10,000 पेक्षा अधिक धावा द्रविड यांच्या नावावर आहेत. या दोन्ही प्रकारात मिळून 400 अधिक झेल त्यांच्या नावावर आहेत. संघाला संतुलन मिळावं यासाठी द्रविड यांनी वनडेत विकेटकीपिंगची जबाबदारीही अनेक वर्ष सांभाळली.
 
भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ मानले जाणाऱ्या द्रविड यांनी भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलं. देदिप्यमान कामगिरीसाठी द्रविड यांना अर्जुन, पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आयसीसीतर्फे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं आहे. आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेममध्ये द्रविड यांनी स्थान पटकावलं.
 
आयपीएल स्पर्धेतही सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचं द्रविड यांनी प्रतिनिधित्व केलं. आयपीएल स्पर्धेत 89 सामन्यांमध्ये द्रविड यांनी 2174 धावा केल्या असून यामध्ये 11 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.
 
बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ तसंच प्रशिक्षक आणि अन्य स्टाफच्या निवडीसंदर्भात घोषणा केलेली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवड न झालेले अनुभवी शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार या दोघांसह हार्दिक पंड्याचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे.
 
प्रस्तावित कार्यक्रमानुसार, 13,16,19 जुलै रोजी वनडे तर 22,24,27 जुलै रोजी ट्वेन्टी-20 सामने होतील. श्रीलंका क्रिकेट बोर्ड यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. भारतीय संघाला श्रीलंकेला दाखल झाल्यानंतर आठवडाभर क्वारंटीन राहावं लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला

४० वर्षांचा शिखर धवन आयरिश प्रेयसीशी दुसऱ्यांदा लग्न करणार.

शिखर धवन परत अडकणार लग्नबंधनात

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments