Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋषभ पंत कार अपघातात जखमी, देहरादून येथील रुग्णालयात दाखल

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (12:30 IST)
क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.
ऋषभ पंतच्या कारची डिव्हायडरला धडक बसली आहे. व्हायरल झालेल्या फोटोनुसार, पंत ची कार जळून खाक झाली आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात पंतला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यात आतापर्यंत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
 
"भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत," अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
 
अपघात कसा झाला?
हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा अपघात पहाटे 5.30-6च्या दरम्यान झाला. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. समोरची विंडशील्ड तुटली आणि तो बाहेर पडला. त्यानंतर कारनं पेट घेतला. प्राथमिक उपचारानंतर लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं आणि त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं."
 
"आम्ही डॉक्टरांशी बोललो आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की, प्राथमिक तपासणीत जीवघेणं असं काहीही समोर आलेलं नाही. कोणतीही अंतर्गत दुखापत नाही. पायाला दुखापत आहे. पाठीला खरचटलं आहे. डोक्यालाही जखम आहे. बाकी एक्स- रे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल.”
 
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केलं आहे. ऋषभच्या प्रकृतीला धोका नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. असं ते म्हणाले आहेत.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम अखेर जो रूटने मोडला

WPL 2025: लिलावाची तारीख जाहीर,या दिग्गज खेळाडूंचा लिलाव होणार

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

पुढील लेख
Show comments