Dharma Sangrah

राहुलचा भारतीय संघात समावेश करण्याची सुनील गावस्कर यांची मागणी

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (16:01 IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले होते. 
 
चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाईल. लंडनमधील ओव्हल येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल खेळतील, तर आयपीएल संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल. आता भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा प्रयत्न यावेळी अंतिम फेरीवर नाव कोरण्याचा असेल. डेव्हिड वॉर्नरच्या ऑस्ट्रेलियन संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर अश्विन-जडेजा यापैकी एकालाच भारतीय संघात संधी दिली जाणार आहे. याशिवाय यष्टिरक्षकाबाबतही अनेक गोष्टी घडत आहेत. भारतीय संघात अश्विन-जडेजा यापैकी एकालाच संधी दिली जाणार आहे.
 
लोकेश राहुलचा यष्टिरक्षक म्हणून टीम इंडियात समावेश व्हायला हवा, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्याने शतक झळकावले होते. लॉर्ड्सवर WTC फायनलसाठी तुमचा संघ निवडताना केएल राहुलला लक्षात ठेवा." गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्याने शतक झळकावले होते. लॉर्ड्सवर WTC फायनलसाठी तुमचा संघ निवडताना केएल राहुलला लक्षात ठेवा."

लोकेश राहुल खराब फॉर्मशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली आणि दोन्ही वेळा तो अपयशी ठरला. यानंतर त्याच्याकडून संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आणि त्याला संघातूनही वगळण्यात आले.
 
 
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी शुभमन आणि हार्दिकचे पुनरागमन, सूर्या कर्णधारपदी

IND vs SA: आयसीसीने भारतीय गोलंदाज हर्षित राणाला दंड ठोठावला

IND vs SA: T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या दिवशी होऊ शकते

स्मृती मानधना सोबतचा विवाह पुढे ढकलल्यानंतर पलाशने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली

स्मृती मानधनाचे लग्न 7 डिसेंबरला होणार ?

पुढील लेख
Show comments