Marathi Biodata Maker

टीम इंडिया विजयी, मालिका 3-0 अशी जिंकली

Webdunia

टीम इंडियाने गॉल आणि कोलंबो कसोटी सामन्यांपाठोपाठ श्रीलंका दौऱ्यातली कॅण्डी कसोटीही जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून, कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला.

भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांच्या दमदार शतकामुळे भारताने जबरदस्त खेळी करत पहिल्या डावात 487 धावांची मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. त्यामुळे भारताकडे तब्बल 352 धावांची आघाडी होती.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक बाद 19 धावांवरुन सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 181 धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

थेट सामन्यादरम्यान रायन ई-सिगारेट ओढताना दिसला आणि चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली

सचिन तेंडुलकरने पालघरमध्ये ‘Climate Smart Village’ प्रकल्पाचा शुभारंभ केला

स्मृती मंधाना आयसीसी क्रमवारीत एका स्थानाने घसरली; दीप्तीची क्रमवारी वाढली

राजस्थान रॉयल्सने शानदार कामगिरी करत पंजाब किंग्सला पराभूत केले

Team India Schedule: भारतीय संघ मे महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे, संपूर्ण वेळापत्रक पहा

पुढील लेख
Show comments