Dharma Sangrah

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

Webdunia
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (13:02 IST)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIA च्या हाती यासंदर्भातली काही कागदपत्रे लागली आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
 
या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत सर्वात शेवटी विराट कोहलीचेही नाव आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या यादीत विराट कोहलीचे नाव कोणत्या कारणामुळे आले याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाही. केरळ मधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या High Power Committee ने देशभरातील या महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडला द्रविड-कुंबळे यांचे नाव देण्यात येणार

15 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दोन देशांमध्ये होणार

राजस्थान रॉयल्सचा कर्णधारपदी रियान पराग

पुढील लेख
Show comments