Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओबामांची मुलगी करते रेस्टॉरंटमधील टेबल साफ

Webdunia
रविवार, 7 ऑगस्ट 2016 (22:01 IST)
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मुलगी एका रेस्टॉरंटमधील टेबल साङ्ख करते हे वाचून नवल वाटेल मात्र हे खरे आहे. 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलगी नताशा ओबामा सध्या बॉस्टनमधील नॅसीज नवाच्या रेस्टॉरंटमध्ये टेबल साङ्ख करताना पाहायला मिळत आहे. वास्तविक, नताशा सध्या या रेस्टॉरंटमध्ये समर जॉब करत आहे. 
 
काही मीडिया रिपोर्टनुसार, नताशा ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत आहे, तिथे सहा लोक तिची मदत करत आहेत. पण नताशाची मदत करणारे हे सहाही जण सुरक्षा संस्थेचे एजन्ट आहेत. नताशाच्या सुरक्षेसाठी या सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण ते नताशाच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करत नसल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. 
 
नताशा, नॅसीज रेस्टॉरंटच्या नियमांनुसार, निळ्या रंगाचा टीशर्ट आणि कॅप परिधान करून काम करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामांनी आपल्या दोन्ही मुलांचे पालन-पोषण अतिशय सामान्य पद्धतीनेच केले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments