Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक

Webdunia
शनिवार, 4 डिसेंबर 2021 (15:02 IST)
4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. आणि विशेष म्हणजे भारतीय नौदल 17 व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. 
 
1934 मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या रॉयल इंडियन नेव्ही (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 
 
तेव्हा मराठा साम्राज्याच्या परकीय व्यापाराला पोर्तुगीज, डच, इंग्रजी जहाजांचा अडथळा होत असे आणि त्यांना कर दिल्याशिवाय जहाजांना अरबी समुद्रात विहार करणे शक्य नव्हते. 1658 साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. कोकण ते गोव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी मराठा आरमार सक्षम होतं. मराठा आरमाराची स्थापना झाल्याने कोकण किनारपट्टीचे समुद्री लुटारुंपासून संरक्षण होत असे. 
 
मराठा आरमारासाठी सक्षम जहाजांची निर्मिती पेन, कल्याण आणि भिवंडी येथे झाली असल्याचे समजते. या जहाजांची निर्मिती 1657 ते 1658 या दरम्यान झाली होती. ऐतिहासिक दस्ताऐवजांप्रमाणे आरमारात दोन स्क्वाड्रन असून प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये 200 जहाजे होती. तसेच इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे 1665 मधे मराठा आरमारामधे 85 लढाऊ आणि 3 अतिशय उच्च दर्जाची जहाज होती तर 1670 मधे 160 नवीन जहाजांची बांधनी करण्यात आली. 
 
शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्री सीमांचे सरंक्षण होऊन बळकटी आली असून आरमाराकडे मराठा सैन्याचा एक भाग म्हणून पाहिले जात होते. महाराजांच्या या नौदल रणनीतीचा उल्लेख आजही गौरवाने केला जात असून सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. 
 
भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होत असून भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे 155 युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. 200 मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
 
1953 मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि 1967 मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या. युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने मध्ये 1966 वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत 80 युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.
 
1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. 4 डिसेंबरला ही कामगिरी म्हणजे ऑपरेशन ट्रायडण्ट यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments