Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेटिक आयआयटी-मुंबई यांच्यातर्फे ‘मेधा’ २०१९' या मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉनचे आयोजन

Webdunia
गुरूवार, 13 जून 2019 (11:26 IST)
वैद्यकीय गरजा भागविणाऱ्या कल्पक उपकरणांच्या नवनिर्मितीसाठी प्रेरणा देण्यासाठी आयआयटी मुंबईतील, बायोमेडिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी इनक्युबेशन सेंटर (‘बेटिक’), सीओई पुणे आणि व्हीएनआयटी नागपूरयांच्यातर्फे मेडिकल डिव्हाइस हॅकेथॉन अर्थात मेधा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने डॉक्टर आणि इंजिनीअर्स एका व्यासपीठावर एकत्र येऊन नावीन्यपूर्ण उपकरणांची निर्मिती करतात. २०१४सालापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. 
 
या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचे व्हिडियो पाहतात आणि एकत्रितपणे काम करून उपाययोजनेची निर्मिती करतात.  प्रत्येक पथकात डॉक्टर्स, डिझायनर्स आणि इंजिनीअर्स (मेकॅनिकल वइलेक्ट्रॉनिक्स) यांचा समावेश आहे. ते विचारमंथन करून, आराखडे काढून प्रोटोटाईप्स तयार करतात. आघाडीच्या नवनिर्मात्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रगत प्रशिक्षण व फेलोशिप प्राप्त करण्याची संधी मिळते.आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ‘मेधा'ची ८ पर्वे आयोजित करण्यात आली आहेत.
 
यंदा ‘बेटिक’, मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट ऑफ टेस्टिंग, रिसर्च अँड ट्रेनिंग, पुण्यातील व्हेंचर सेंटर आणि नागपूरमधील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या संस्थांमध्ये जुलैमधील शनिवार-रविवारी ‘मेधा’चेआयोजन करणार आहे. 
 
"पूर्तता न झालेल्या गरजा मांडणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक इंजिनीअर्स यांना ‘मेधा’ एकत्र आणते. ते निदान किंवा उपचारासाठी नवीन वैद्यकीय उपकरणांच्या ठोस संकल्पना तयार करतात. याकल्पनांवर ‘बेटिक’च्या विविध केंद्रांमध्ये पुढे काम होते किंवा उत्पादने विकसित करण्यास तसेच त्यात रस असलेल्या संस्था त्यांना स्टार्टअप कंपनीद्वारे बाजारात आणण्याचे किंवा परवाने घेऊन उद्योगात आणण्याचे काम करतात.गेल्या चार वर्षांत आमच्या टीम सदस्यांनी ५० पेटंट्स फाईल केली आणि त्यातील १२ संकल्पनांसाठी परवाने मिळाले आहे. या संकलप्ना स्टार्टअप्स किंवा प्रस्थापित उद्योगांच्या माध्यमातून वास्तवात येणार आहेत. यातील अनेककल्पनांचे उगमस्थान ‘मेधा’ होती,” असे ‘बेटिक’चे संस्थापक प्राध्यापक बी. रवी म्हणतात. 
 
इच्छुक उमेदवारांना २५ जून २०१९पूर्वी ‘बेटिक’च्या वेबसाईटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना त्यांचा बायो-डेटा, सृजनात्मक कामाचा पोर्टफोलिओ अपलोड करावा लागेल. त्या आधारे त्यांना शॉर्टलिस्ट केलेजाईल, मुलाखती घेतल्या जातील आणि निवड होईल. निवडलेल्या उमेदवारांनी १००० रुपयांची नॉन-रिफंडेबल फी भरणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments