Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’ख्याल’ चित्रप्रदर्शनात मिळते अनोख्या विश्वाची अनुभूती

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (07:54 IST)
नाशिक :कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. जीवनात आलेल्या अनुभवातून तो तयार होत असतो. यातही ती व्यक्ती जर स्त्री असेल तर यात नक्कीच वेगळेपणा दिसून येतो. हाच वेगळेपणा प्राध्यापिका, चित्रकार स्नेहल तांबुळवाडीकर – खेडकर यांनी रेखाटलेल्या चित्रांमधून येतो. या चित्रांचे ‘ख्याल’हे चित्र प्रदर्शन इंडेक्स आर्ट गॅलरी, पहिला मजला, पंचगंगा अपार्टमेंट, निलेश सुपर मार्केटच्या मागे, तिडके कॉलनी, नाशिक येथे भरविण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबरपर्यत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना पाहाता येणार आहे.
 
चित्रकार खेडकर या शिक्षक म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि राष्ट्रीय डिझाईन संस्थान (NID)सारख्या कला संस्थांमध्ये अध्यापनाचे कार्य करतात. "ग्लोबल आर्ट ऑफ मॉडर्न इंडियन पेंटर्स" या नावाचे त्यांचे पुस्तकही प्रदर्शित झाले आहे.
 
 या प्रदर्शनात वेगेवगळ्या विषयावरची १५ चित्रे मांडण्यात आली आहेत. याबाबतअधिक माहिती देतांना खेडकर सांगतात की, यामध्ये दंतकथा, लोककथा या विषयासह अगदी रोजच्या जीवनातील काही घटना सुद्धा रेखाटल्या आहेत. ज्याचा अनुभव रोज अनेकजण घेतात. चित्रे रेखाटतांना त्यामध्ये सुक्ष्मपणा जपताना आपला स्वतंत्र असा विचार देखील मांडला असल्याचे त्या सांगतात. उदाहरणार्थ काळू नावाच्या चित्रांत काळी मांजर मालक ज्याप्रमाणे व्यायाम करत आहे. यात अनेकदा काळी मांजर अशुभ मानली जाते. मात्र ही मांजर मनुष्याप्रमाणेच कृती करते असे सांगितले आहे. तर दोघांमधले प्रेम हा सुद्धा विचार मांडला आहे. यातून कुठला विचार घ्यायचा हे रसिकांनी ठरवायचे आहे. वाघाची मावशी या चित्रातही अशाचप्रकारे कल्पनेचा सुंदर अविष्कार मांडला असल्याचे त्या सांगतात.
 
प्रदर्शनाचे कला प्रबंधक नितीन वरे सांगतात, की चित्रांमध्ये सृजनशीलता आणि संवेदनशीलता या दोघांचा संगम दिसतो. त्यामुळेच ही चित्रे अतिशय बोलकी वाटतात. यासोबतच रसिक ज्या विचाराने चित्र पाहणार आहे त्याला तसा विचार गवसणार आहे. रसिकांचा हाच चित्रांसोबतच संवाद सोपा व्हावा यासाठी प्रत्येक चित्राला नाव देण्यात आले आहे. उदाहरणार्थ काळू, वाघाची मावशी, प्रकृती, सुरंगी, सीतम्मा, श्रुंगार, नागमंडल, कलापूर्ण, कलाभाषिणी, डूम्मा, प्रतिमानी, कृष्णा, पुरुष, लच्छी आदी. कलाकार हा त्याच्या वैयक्तिक जाणिवा आणि भावनांचे दृश्यरूप चित्रकलेतून अभिव्यक्त करत असतो. यामध्ये दृश्य कला ही कविता म्हणजेच साहित्य कला आणि संस्कृतीमध्ये वसलेल्या लोककथा आणि दंतकथांपासून प्रेरित झालेली असू शकते. आणि याप्रकारचाच अनुभव आपल्याला "ख्याल" या कलाप्रदर्शनातून मिळावा यासाठी हे प्रदर्शन सादर करण्यात आले आहे.
 
गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत असलेली इंडेक्सआर्ट गॅलरी कोरोनानंतर  सगळ्यांच्याच बदलेल्या आयुष्यात एक नवी सुरुवात करण्याच्या उद्देशाने चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे. सोबतच अशा प्रदर्शनातून नाशिकच्या कलाकारांना कला सादर करण्यासाठी हक्काची जागा मिळावी या विचारातून गॅलरीची उभारणी केली असल्याचे इंडेक्स आर्ट गॅलरी चे  रुचिर पंचाक्षरी सांगतात. तरी रसिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री! महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार, हा मुख्यमंत्र्यांचा नवा फॉर्म्युला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून लोकांची मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना

कॅबिनेट मध्ये दिसणार नवे चेहरे, 30 तारखेला होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

पुढील लेख
Show comments