Festival Posters

नरेंद्र मोदी यांचा जीवन परिचय

Webdunia
नरेंद्र दामोदरदास मोदी : जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतीज्ञ होते.
 
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरातच्या विकासासाठी मोदी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
 
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात अमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते योग्य ते योगदान देऊन सार्थ करत आहेत.
 
पूर्व जीवन
मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.
 
भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकला.
 
गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावली.
 
शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.
 
राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले.
 
फक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्‍यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकला नाही. आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.
 
गुजरातचे मुख्यमंत्री
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पद मोदींनी जवळपास चौथ्यांदा ग्रहण केले आहे.
 
त्यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 
 
१.  मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीमधे नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता असा खुलासा संजिव भट ह्या पोलिस अधिकाऱ्यानी १८ पानी आरोप पत्र दाखल करुन केला आहे. 
 
 
पुस्तके
नरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत: ती अशी :-
 
एक्झॅम वॉरियर्स
कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद
कुशल सारथी नरंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)
द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ
दूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)
नरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)
नरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)
नरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)
नरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)
नरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)
Narendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)
मोदीच का? (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन
मोदीनामिक्स (डॉ. विनायक गोविलकर)
Modi's World : Expanding Sphere of Influence (इंग्रजी, लेखक : सी. राजा मोहन)
स्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)
स्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)
 
नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके
आपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)
एक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)
ज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)
सामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून बस भाड्यात १०% हंगामी वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'काम करा किंवा पद सोडा' असा कडक इशारा दिला

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

ट्रायल रूममध्ये महिलांनी सावधगिरी बाळगा; पुण्यात दुकानदाराने कॅमेरा लावून महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले

मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे हाहाकार, महाराष्ट्रात ५ जणांचा मृत्यू; पिकांचे नुकसान तर जनावरे मृत्युमुखी पडले

पुढील लेख
Show comments