Festival Posters

Kusumagraj Death Anniversary : कुसुमाग्रज स्मृतिदिन

Webdunia
मंगळवार, 10 मार्च 2026 (10:33 IST)
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णु वामन शिरवाडकर होते. त्यांना कुसुमाग्रज या नावाने देखील कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली पुणे येथे झाला.

कुसुमाग्रज कौटुंबिक माहिती
 कुसुमाग्र यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. तसेच त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे टोपणनाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.

शिक्षण-
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
 ALSO READ: कुसुमाग्रज कविता संग्रह<> पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तसेच कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले.
 ALSO READ: कुसुमाग्रज यांच्या दोन सुंदर कविता<> वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.

पुरस्कार  
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments