Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संक्रांत : पर्व काळात सुपात्र दान नव्या रुपात -काळाची गरज

Webdunia
गुरूवार, 13 जानेवारी 2022 (19:49 IST)
"तीळ गुळ घ्या अन् गोड बोला" असे आनंदाचे उद्गार घेऊन येणारा नवीन वर्षाचा पहिला वहिला सण म्हणजे संक्रांत. नववधू आणि नवोदित बाळांचा "हलव्याचे दागिने" चा गोड सण. काळ्या साडी वर पांढरी शुभ्र खडी म्हणजे पोर्णिमेच्या रात्री विखुरलेले चांदणे जणू. धार्मिक शास्त्रानुसार सूर्याचा उत्तरायणात प्रवेश अर्थात नैराश्याची सकारात्मकते कडे वाटचाल. 
 
सद्यस्थितीत सकारत्मकतेची अत्यंत आवश्यकता आहे. मागील दोन वर्षांंन पासून कोरोनाचे  काळे सावट संम्पूर्ण मानव प्रजातीला आव्हानात्मक ठरले आहे. आपले अस्तित्व, स्वकियांचे जीवन, ह्यात समतोल ठेवण्यात सारं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बळ सुध्दा निष्फळ ठरले आहे. असो.  हा विषय आता चर्चे पेक्षा सावरण्याचा अधिक आहे. 
 
संक्रांत ह्या सणाचा सांस्कृतिक वारसा जरा नवीन अर्थाने जपूया. माझे  वैयक्तिक मत आपल्या समोर व्यक्त करत आहे.  पटल्यास आपण पण अनुसरण करावे. 
 
सूर्याचे  उत्तरायण अर्थात सकारात्मकता असे आपण म्हणतो.  निसर्ग सुध्दा ह्या काळात आपल्याला भरभरून देत असतो. उदाहरणार्थ चणा, ऊस, बोरं आरोग्यवर्धक तीळ, गुळ आणि उन्हाळ्यात लागणारा मातीचा माठ सुध्दा.  हे सर्व साहित्य आपण पर्व काळात दान ह्या पूण्यकार्यात  वापरतो. हळदी कुंकू चा आवा स्त्री उपयोगी वस्तू देऊन साजरा करतो.  ही तर झाली आपली पारंपरिक पध्दत. 
 
आता जरा नव्याने विचार करुया. कोरोनाच्या दुःचक्रात अनेक परिवार आर्थिक दॄष्टीने निर्बळ झाले आहेत. अशा प्रसंगी आपण आव्यात प्लास्टिक या अन्य वस्तू देण्या ऐवजी आपल्या क्षमतेनुसार एका गरजू परिवारास धान्य  भरुन दिले, जुन्या कपड्यांन सोबत काही नवीन कपडे भेट म्हणून अनाथाश्रमात दिले,  किटी पार्टी या महिला मंडळाच्या भगिनींन  सोबत वॄध्दाश्रमात औषधांचे वाटप केले तर, एखाद्या होतकरू मुलाला शाळे साठी इन्टरनेट कनेक्शन वा आपल्या घरी  व्यवस्था करुन दिली तर त्यांंचे भविष्य सुध्दा उज्ज्वल होईल. 
 
आजकाल बहुतांश युवा वर्ग घरुन काम करत आहे. शनिवार - रविवार मुलांना शिकवून त्यांच्या महाग कोचिंगचे पैसे वाचवु शकतो. आजची छोटी मदत स्वर्णीम भविष्याचा आधार होऊ शकते. आपल्या मधील अनेकांची  मुले नोकरी  निमित्ताने बाहेर गावी असतात. काही मित्रांन सोबत तर काही एकटेच राहतात. अशा वेळेस बाहेरुन खाद्य पदार्थ मागवतात या वेळे अभावी घरातील वस्तू खाण्यात येत नाही,  जास्तीचा भाजीपाला असतो  तो जर वेळोवेळी  कोणाला ही दिला तर त्याचा सदुपयोग होतो.  तसेच आपल्या घरात अनेक वस्तू दुप्पट असतात परंतु त्या दुसऱ्या साठी आवश्यक असतात त्या दिल्याने आपण त्याची गरज भागवू शकतो. 
 
मला सुचलेले पर्याय मी आपल्या समोर मांडले. आपल्या ही काही अभिनव कल्पना असतील  तर माझ्या लेखाला प्रतिसाद म्हणून नवीन वर्षाची सुरुवात नव्या अर्थाने करावी असा माझा प्रेमळ आग्रह आहे. फ्लॅटच्या बंद दाराच्या संकॄतीला  या मला काय करायचे आहे या विचारांना परिवर्तन देऊन सामाजिक वाटा उचलू या. 
 
हा अभिनव उपक्रम संक्रांती पासून सुरू करू या अन् "तीळ गुळ घ्या "ह्या उक्तीला " एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ" ह्या सुंदर आचरणाने परिपूर्ण करुया. 
 
कापलेल्या पतंगा समान भिरभिरणाऱ्या आयुष्याला सुदृढ दोरीच्या साह्याने  निरभ्र आकाशात उन्मुक्त  उडण्याची संधी देऊन या सणाची सार्थकता खऱ्या रुपाने सार्थ करुया. 
 
सौ. स्वाती दांडेकर
इन्दोर
9425348807

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments