rashifal-2026

माझी पूजा अपूर्ण आहे !

Webdunia
सोमवार, 5 एप्रिल 2021 (16:24 IST)
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो ! 
पण त्या पांढर्‍या  रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो ! 
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज मी देवाजवळ दिवा लावतो ! 
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो ! 
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !
पण त्या कापराच्या  वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो ! 
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
रोज मी देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान करतो !
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो ! 
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो ! 
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार

लातूरमध्ये तरुणाची पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments