rashifal-2026

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (10:05 IST)
Punyatithi of Swami Vivekanandaस्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र असे.त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी दत्त होते.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.या मुळे त्यांच्या वर चांगले संस्कार होते.त्यांचे वडील उच्च न्यायालयात वकिली करत होते.
 
स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते.ते अलौकिक प्रतिभावंत होते.ते लहान असताना त्यांना इतिहास साहित्य अशा अनेक विषयांची आवड होती. त्यांनी तत्त्वज्ञान,धर्म, इतिहास,सामाजिक विज्ञान,कला व साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले.त्याच बरोबर त्यांनी वेद ,उपनिषद ,पुराण ,रामायण-महाभारत अशा हिंदु धर्मात ग्रंथांचा अभ्यास केला.त्यांना वाचन ,व्यायाम ,कुस्ती ,पोहणे,घोडेस्वारी, गायन-वादन इत्यादींची आवड होती. .स्वामी विवेकानंदांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली.
 
नंतर त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन इंस्टीट्यूट मध्ये  प्रवेश घेतला. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेटले आणि त्यांनी परमहंस यांना आपले गुरु मानले.रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद केले.विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.
 
रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचावा या साठी रामकृष्ण मिशन देखील सुरु केले.रामकृष्ण यांनी समाधी घेतल्यावर ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले आणि कन्याकुमारी येथे पोहोचले.त्यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेचा उद्धार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले.मातृभूमीची सेवा करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पित केले. 
 
त्यांनी आपले विचार जगभरात पोहोचावे या साठी अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मीय परिषदेत भारताचे नेतृत्व करून आपल्या सुंदर वक्तृत्वाने अमेरिकेतील लोकांची मने जिंकली.स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधु भगिनींनो असे उद्गार काढतात परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला .  
 
त्यांनी सर्वधर्मना धर्म आणि अत्याचारासाठी लढायचे आहे हे जगाला पटवून दिले.त्यांनी विश्वबंधुत्त्वाचे नाते निर्माण केले. उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.असे त्यांचे थोर विचार होते.
 
त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत.अशा या महान व्यक्तीचे 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे निधन झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मुंबईत महापौरपदाची लढाई, भाजप-आरएसएस विरुद्ध ठाकरे बंधू आमनेसामने

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

पुण्यातील डीएसटीए ट्रस्टची जमीन बेकायदेशीरपणे विकल्याचे आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय वादात सापडले

शिखर धवन परत अडकणार लग्नबंधनात

नाशिक महानगरपालिका निवडणूक: 122 जागांवर 735 उमेदवार निवडणूक लढवणार

पुढील लेख
Show comments