rashifal-2026

मसाज करणारा अजगर

Webdunia
कोणताही साप पाहिला तर त्यापासून चार हात दूर पळणे ही माणसाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. त्यातून अजगरासारखे जनावर असेल तर मग पळता भुई थोडी होण्याची वेळ येते. अजगर आपल्या शरीरावर येतोय असा नुसता भास झाला तरी अनेकांची शुद्ध हरपेल, भीतीने बोबडी वळेल. पण जर्मनीतील एका सलूनमध्ये गेली १३ वर्षे एक अजगर मसाजिस्ट म्हणून सेवा देत आहे आणि या मसाजसाठी वेगळा चार्ज आकारला जात नाही. हा अजगर मानेसाठी मसाज करण्यात एक्स्पर्ट समजला जातो.
 
अजगराकडून मसाज अशी कल्पना करणेही खरेतर अवघड आहे. या मसाजमुळे स्नायू सैलावण्याअगोदर भीतीने आखडतील असेही आपल्याला वाटेल. पण ज्यांनी हा मसाज करून घेतला आहे त्यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. जर्मनीच्या ड्रेस्डन येथील द हार मोड टीम सलून मध्ये मोंटी नावाचा हा अजगर आहे. त्याची चर्चा जगभरात केली जाते आहे. अन्य मसाज झाला की ग्राहकाच्या गळ्यात हा अजगर घातला जातो. सुरवातीला भीती वाटली तरी हा अजगर हळूहळू सर्व टेन्शन दूर करतो असा अनुभव सांगितला जातो. त्याच्या मसाजसाठी वेगळा चार्ज नाही मात्र ग्राहक अजगराच्या भोजनासाठी इच्छेनुसार दान देऊ शकतात.
 
मानेभोवती अजगराची मिठी पडली की गार वाटणार ही कल्पना येथे खोटी ठरते. प्रत्यक्ष अजगराचा स्पर्श उबदार तर असतोच पण हळूहळू मानेचा ताण पूर्णपणे नाहीसाही होतो असा अनुभव ग्राहक सांगतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: धनुष्यबाण आणि घड्याळाचे खरे मालक कोण? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

शिवसेना -NCP पक्ष चिन्हाबाबत आज सुनावणी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

India vs New Zealand आज नागपूरमध्ये टीम इंडिया किवी संघाशी सामना करेल

भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांची नियुक्ती

पुढील लेख
Show comments