Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

5 दशकं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना,एक पूर्ण रिपोर्ट

Webdunia
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (16:37 IST)
मुंबई : गेली 5 दशकं मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी शिवसेना, जिथे अन्याय असेल तिथे वार करणारी शिवसेना, मराठी अन् हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना गेली तीन महिने अभूतपूर्व संकटातून जातीये. पक्षात अनेक वेळा अनेक नेत्यांनी बंड केलं. पण पक्षावर कुणी दावा सांगितला नाही. मात्र तीन महिन्यांपूर्वी ठाणेदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाला सुरुंग लावून, उद्धव ठाकरेंना हादरा देऊन संपूर्ण पक्षच खिळखिळा केला. हा सगळा वाद न्यायालयात आणि पुढे निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचला. आजपर्यंत शिवसेनेने प्राणपणाने जपलेलं चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं. या साऱ्या घटनांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राला संबोधित करताना शिवसेना स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास जागा केला. शिवसेना स्थापनावेळी फोडलेल्या नारळाचं पाणी माझ्या अंगावर पडलं होतं, असं सांगत शिवसेनेत तुम्ही कधी सक्रिय झालात? असा सवाल विचारणाऱ्यांना त्यांनी रोखठोक उत्तर दिलं. तत्पूर्वी शिवसेना पक्षाची स्थापना कशी झाली, पक्षाला/संघटनेला शिवसेना हे नाव कुणी दिलं? त्यापाठीमागचा इतिहास काय आहे? अशा प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊ...
शिवसेनेचा जन्मच मुळी संघर्षातून झाला आहे. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर सभा बोलावली. मुंबईच्या सार्वजनिक जीवनात लोक त्यांना ओळखू लागले होते. त्यांना भीती वाटत होती की या सभेला जास्त लोक येणार नाहीत. त्यानंतरही त्यांनी 50 हजार लोकांसाठी मोठी व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात 2 लाख लोक सभेला पोहोचले. तेथे त्यांनी मित्रांसोबत नारळ फोडून शिवसेना स्थापन केली. यामध्ये त्यांनी पहिले भाषण केले.
 
मराठी अस्मितेच्या नावावर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या प्रवासाला पाच दशकांहून अधिक काळ झाला आहे. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवरायांचा पक्ष. मराठी अस्मितेसाठी स्थापन केलेला. ज्याचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण तर प्रतीक वाघ आहे. सध्या महाराष्ट्राच्या सत्तेवर शिवसेनेचा ताबा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रमुख आहेत. मात्र, शिवसेनेला स्थापनेपासूनच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. पक्षाची विश्‍वासार्हता, ताकद सर्वच धोक्‍यात आले आहे.
 
 70 च्या दशकापासून महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद सातत्याने वाढत आहे. विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत राज्याच्या राजकारणात एक प्रमुख शक्ती म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. शिवसेना एकेकाळी सामाजिक पक्ष आणि चळवळीच्या रूपात होती, पण आता तो निव्वळ राजकीय पक्षाच्या साच्यात पडला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची मुळे अधिकाधिक खोलवर गेली आहेत. तसे पाहता, आजही शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत या संस्थेचे शाखाप्रमुख आजही लोकांच्या समस्या, परिसरातील वादांपासून ते कोणत्याही मार्गाने कामे मार्गी लावण्यापर्यंतचे काम करतात.
1966
1966 या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना शिवसेना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. त्यांनी संघटना स्थापनेची घोषणा केली तो दिवस होता 19 जून 1966.
 
बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी केवळ अठरा लोक हजर होते. त्यामध्ये ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते.
 
यावेळी नाईक नावाच्या एका कार्यकर्त्यांनी शेजारच्या किराणा मालाच्या दुकानातून नारळ आणला. सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांच्या हस्ते नारळ फोडून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा उद्घोष करीत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.
 
मार्मिकमधून संघटनेच्या कार्यकर्त्यांची नोंदणी सुरू झाल्याचे जाहीर केल्यावर मार्मिक कचेरीवर झालेल्या तुडुंब गर्दीत २००० तक्ते तासाभरात संपले आणि महिन्यात वीस हजार सैनिकांची नोंदणी झाली. अल्पावधीतच शिवसेना ही चार अक्षरे मुंबईतील घराघरात पोहोचली.
 
सतत वाढणाऱ्या जागा
राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली होती. या लोकसभा निवडणुका होत्या. 5 जागांवर उमेदवार उभे केले. कोणत्याच जागेवर विजय मिळाला नाही. 80 च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच 01 जागा जिंकली होती.
 
1996 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 132 जागांवर उमेदवार उभे केले आणि 15 जिंकले. हे एक मोठे यश होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढवलेल्या जागांची संख्या कमी झाली आणि जिंकलेल्या जागा अधिक झाल्या. दोन्ही ठिकाणी सेनेने 20 आणि 23 जागांवर उमेदवार उभे केले आणि 18-18 जागा मिळाल्या.
 
तसे तर भाजपच्या आधीही युती तुटली
आश्‍चर्याची बाब म्हणजे इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा वेगळं शिवसेनेने पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर विधानसभा. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा जोरदार प्रयत्न केले. 183 जागा लढवल्या आणि 52 जिंकल्या. त्यानंतर त्याच्या जागा वाढत गेल्या. 2009 मध्ये शिवसेनेला पहिल्यांदाच धक्का बसला. जिंकलेल्या जागा कमी होऊन 45 वर आल्या.
2019 मध्ये, जागांवरून भाजपशी त्यांचे मतभेद समोर आले. मात्र, तरीही त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या. यावेळी त्यांच्या वाट्याला 56 जागा मिळाल्या. मात्र, सरकार स्थापनेवरून मतभेद इतके वाढले की भाजपपासून वेगळे होऊन कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. हे सरकार आता अडचणीत आले आहे. पक्षातील एक मोठा वर्ग बंडखोर झाला असून त्याची पडझड होणार असल्याचे दिसून येत आहे. केवळ एक चमत्कारच ते वाचवू शकतो.
 
शिवसेनेने निवडणुकीसाठी युती केलेले पक्ष
 
1968 : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
1969 : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
1972 : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
1972 : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
1974 : काँग्रेस
1977 : दलित पँथर (काही काळापुरती)
1977 : काँग्रेस. ही युती 1980 साली तुटली.
1990 ते 2019 : भाजप
2007 आणि 2012 : काँग्रेस
2008 :राष्ट्रवादी काँग्रेस
2019 ते सद्य (2021) : काँग्रेस
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री झाले
 
शिवसेनेने 1989साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात 1999 साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. 2014 साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.
 
2019 साली शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप

Maharashtra : 30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार!

पुढील लेख
Show comments