Festival Posters

चीज, पनीर खाल्ल्याने घटला कवटीचा आकार

Webdunia
न्यूयॉर्क- मानव जातीने चीज, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ खाण्यास सुरूवात केली आणि त्यांचा कवटीचा तसेच जबड्याचा आकार छोटा व कमजोर होत गेला, असे संशोधकांनी म्हटले आहे. या खाद्यपदार्थांमुळे आदिम मानवाला खाण्याचा अधिक पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय मिळाला त्यामुळे शिकारीवरील त्यांची निर्भरता कमी होऊ लागली.
 
मुलायम पदार्थ खाण्याची सवय लागल्यामुळे जबड्यावरील दबावही कमी झाला. शिकार बंद झाल्याने हात-पायही छोटे होत गेले. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सुमारे एक हजार मानवी कवटींवर संशोधन केले. या कवटी संपूर्ण जगाच्या विविध भागातून गोळा करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माणसाने शेतीवाडी करण्यास आणि दुग्धोत्पादनावर अवलंबून राहण्यास सुरूवात केल्यानंतरच्या काळातील माणसाच्या कवीटींचाही समावेश होता. या काळाच्या आधीच्या कवटींच्या तुलनेत नंतरच्या माणसाच्या कवटी तसेच जबड्यात तफावत आढळून आली.
 
मा़णूस फळे, भाज्या, दुग्धपदार्थ आणि धान्यावर अधिक अवलंबून राहू लागल्याने जंगलात शिकार करुन पोट भरण्याची गरज उरली नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पाळीव कुत्र्यावरच्या प्रेमापोटी दोन बहिणींनी आत्महत्या केली

ऑनलाइन ऑर्डर ठप्प होणार, गिग आणि प्लॅटफॉर्म डिलिव्हरी कामगारांची 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा

LIVE: मनसे-शिवसेनेमध्ये गोंधळ, निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज भाजपमध्ये सामील झाले

वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला

अजित पवार आणि शरद पवार पुण्यात युतीवर सुप्रिया सुळे यांचे विधान

पुढील लेख
Show comments