संत परंपरा महाराष्ट्राची शान आहे. ह्या महाराष्ट्रात संतांचा जन्म झालाय अशा महाराष्ट्राच्या पावन भूमित आपण राहत आहोत हेच आपलं परम भाग्य समजतो आपण अन अशा महाराष्ट्रात एके दिवशी 2 संतांसह एक व्यक्तिची हत्या होते.तेही निष्पाप अशा संतांचा बळी जातो. तेव्हा समस्त महाराष्टाची मान शरमेने खाली जाते. 400- 500चा मॉब येतो अन संतांवर प्राण घातक हल्ला करतो आपलीच आपल्याला लाज वाटायला हवी. अन प्रशासन निवांत तीन दिवस झोपतं.कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मॉब लिचींग चालूच राहणार जमाव तोही 500 पर्यंत अन पोलिस बघ्याची भूमिका निभावतात. एकी कडे मोदी पोलिसांच गुण गाण गाताय तर दूसरी कडे संतांच्या महाराष्ट्रालाच लाज वाटेल अस कृत्य खुद्द पोलिसांसमोर होतय.
पुण्य अशा भुमित दोन जीव जानं शरमेच तर आहेच.संतांची शिकवण आहे आपल्या पायाखाली एक मुंगी मेली तरी तेही पापच इथेतर त्याच संतांच्याच जीवावर बेतलीय.घटना काहीही असो जनतेनही ते चोर असते तर त्यांना कायद्याच्या हवाली करायला हव होतं. अन पोलिसांनीही जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करुन घटनेच्या खोलात जायला हव होतं.आज ह्या घटनेला धार्मिक रंग ही दिला जातोय. ते राजकारण धर्मा धर्मात कसं तेढ निर्माण करेल हेच बघितलं जातय. आखाडा परीषदेने आंदोलनाचाही इशारा दिलाय.मुख्यमंत्र्यांनी योग्य पाऊल उचलून सीआयडी चौकशीचे आदेश देऊन 110 लोकांना अटकही केलीय.पण यावर मॉब लिंचींगला ठोस अशी कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मॉब लिचींग चालूच राहणार जमावातील राक्षस त्याला कुणाचीच भिती नसते.यावर कठोर कायदा करण्याची गरज आहेच.
सध्या पालघर प्रकरणात बरीच प्रश्न समोर येतात.पोलिसांची बघ्याची भूमिका?राज्यात 144 लागू असताना एवढा जमाव का जमला? असे अनेक प्रश्न समोर येतात.
वीरेंद्र सोनवणे