Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनयभंग म्हणजे नेमकं काय? गुन्हा सिद्ध झाल्यास किती शिक्षा होते?

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (23:22 IST)
राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुद्द आव्हाड यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354 चे. मी या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत."
 
भारतीय दंड विधानानुसार, कलम 354 म्हणजे महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणे होय.
पण, विनयभंग म्हणजे काय? भारतीय दंड संहितेत कोणती कलमं विनयभंगाशी संबंधित आहेत?
 
विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाल्यास काय शिक्षा होते? आणि गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावर असते? आरोपी की फिर्यादीवर?
 
या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेणार आहोत. पण, त्याआधी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया...
 
नेमकं घडलं काय?
रविवारी (13 नोव्हेंबर) ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.
 
या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच तक्रारदार रिदा रशीद या त्यांच्या वाटेत आल्या.
 
त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे गाडीमध्ये बसलेले असतानाच त्यांच्या समोरच हा सारा प्रकार घडल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. तक्रारदार रशीद या भाजप नेत्या आहेत.
 
विनयभंग म्हणजे काय?
भारतीय दंड संहितेत कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.
 
यामध्ये प्रामुख्याने एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, या प्रकाराला विनयभंग असं म्हटलं जातं.
 
विनयभंगाच्या बाबतीत अनेक उप-कलमांचाही कायद्याचे जाणकार उल्लेख करतात.
 
ज्येष्ठ वकील असीम सरोदे सांगतात, "कलम 354 अंतर्गत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास 1 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
 
कलम 354-अ अंतर्गत, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, याचा समावेश विनयभंगामध्ये होतो. यापद्धतीचा गुन्हा शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.
 
कलम 354-ब अंतर्गत, एखाद्या महिलाचा विनयभंग करण्यासाठी तिच्यावर हल्ला केल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 4 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते."
<

NCP के विधायक जितेंद्र आव्हाड ने मुझे सरेआम बेइज्जत किया,मुझे हाथ से पकड़ कर धक्का दिया कहा तू यहां क्या कर रही है,मैं एक महिला हु इस तरह महिला का अपमान सरेआम किया जा रहा है,पुलिस प्रशासन इस पर कार्यवाई करे @PMOIndia @CMOMaharashtra @DevendraForCM @ChitraKWagh @BJPMM4Maha pic.twitter.com/7vVGBlHUIH

— Rida Rashid (@bjpridarashid) November 14, 2022 >
सरोदे पुढे सांगतात, “कायद्यात उद्देश अत्यंत महत्त्वाचा असतो. एखाद्या ठरावीक उद्देशाच्या दृष्टीने कृती केली, तर तो गुन्हा ठरू शकतो."
 
“विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार स्त्रीला व्यक्तिगतरित्या काय वाटलं, यावर खूप काही अवलंबून असतं. पण, आव्हाड यांच्या प्रकरणाचा व्हीडिओ सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. त्यामुळे इतरांना काय वाटलं, तेसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं.
 
 
 गर्दीत एखाद्याला बाजूला सारण्यासाठी नुसतं अंगाला हात लावणं म्हणजे विनयभंग होत नाही.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा कायद्याला धरून सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
 
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कलम 354 ची व्याख्या वाचून दाखवताना पाटील म्हणाले,
 
“एखाद्या स्त्री किंवा पुरुषास लज्जा उत्प्नन होईल, असं वर्तन करणे म्हणजे विनयभंग करणे होईल.
 
“एखाद्या स्त्रीस जबरदस्ती करणे, सदर घटनेत पुरुषानं स्त्रीसोबत केलेले वर्तन तिला लज्जा उत्प्नन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे होते, हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे.
 
“विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, त्यापद्धतीनं बोलणे, कामूक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे, याला विनयभंग म्हणता येईल.
 
“एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा करणे, एखादी गोष्ट किंवा वस्तू दाखवणे, महिलेच्या खासगीपणाचे उल्लंघन करणारे वर्तन करणे, अंगविक्षेप करणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे अशा गोष्टी विनयभंगाखाली येऊ शकतात.”
 
काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते, असा सावल पाटील यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना केला आहे.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख