Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टिळक आणि स्वामी विवेकानंद : दोन महान नायकांची भेट

Webdunia
जिथे स्वामी विवेकानंद समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु होते, तिथे बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्यासाठी झटणारे समाजसुधारक, राजकारणी, पत्रकार आणि लेखक देखील होते. हे कमी लोकांनाच माहित आहे की स्वामी विवेकानंद आणि बाळ गंगाधर टिळक ह्यांची भेट झाली होती. ह्या दोघांची भेट किती उत्तम झाली असेल! चला तर ह्यांची भेटचा प्रसंग जाणून घेऊया.
 
वर्ष 1892 ची गोष्टी आहे, टिळक मुंबईहून पुणे येथे परतत होते, येथे त्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी टर्मिनस) वर स्वामीजींना पहिल्यांदा बघितले होते. टिळक जिथे बसले होते स्वामी विवेकानंद तिथे आले आणि त्याच कंपार्टमेंटमध्ये बसून गेले. स्वामीजींना काही गुजराती माणसं सोडायला आली होती. त्यापैकी एकाने त्या दोघांची एकमेकांशी ओळख करवून दिली.
 
पुणे पोहचण्याआधी त्यांची बरीच ओळख होऊन गेली होती. पुणे पोहोचल्यानंतर टिळकांनी स्वामी विवेकानंदांना त्यांच्या घरी राहण्यासाठी आमंत्रित केलं, हे आमंत्रण स्वामींनी मान्य केलं आणि ते 8-10 दिवस त्यांच्या घरी राहायला गेले. अशी झाली होती बाळ गंगाधर टिळक आणि स्वामी विवेकानंदांची पहिली भेट.
 
हा संवाद 1892 चा आहे म्हणजे स्वामी विवेकानंदाचे शिकागो भाषण झाल्याच्या एका वर्षापूर्वीचा. त्यामुळे टिळक ह्यांच्या घरी रहात असताना जेव्हा त्यांना त्यांचे नाव विचारण्यात आले तेव्हा स्वामीजींनी स्वतःचा "संन्यासी" म्हणून परिचय दिला. त्यावेळी त्यांना ख्याती प्राप्त झालेली नव्हती.
 
स्वामीजींबद्दल सांगताना टिळक हे म्हणाले,”घरी ते अनेकदा अद्वैत तत्त्वज्ञान आणि वेदांत या विषयी बोलत असत. स्वामीजी समाजात मिळणं-जुळणं टाळत असे. त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. एक किंवा दोन वस्त्रे आणि कमंडलू ही त्यांची संपत्ती होती. त्यांच्या प्रवासात त्यांना हव्या त्या स्टेशनसाठी कोणीतरी रेल्वेचे तिकीट देत असावे…”
ह्या भेटीनंतर 1901 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 17 वे अधिवेशनमध्ये सामील होण्यासाठी बाळ गंगाधर टिळक कोलकता येथे आले होते. यावेळी त्यांनी बेलुड मठात जाऊन स्वामी विवेकानंदांची भेट घेतली होती.
 
टिळक हे स्वामी विवेकानंद यांच्यासह टिळकांचे घरी उपस्थित असताना बासुकाकांनी विवेकानंद आणि टिळक यांच्या असे संवाद केले की "टिळक राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादासाठी काम करतील, तर विवेकानंद धार्मिक क्षेत्रात राष्ट्रवादासाठी काम करतील.” 
 
4 जुलै 1902 रोजी जेव्हा स्वामीजींच्या महान आत्म्याने त्यांचे देह त्यागले तेव्हा टिळकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या केसरीमध्ये लिहिले: "कोणताही हिंदू ज्याच्या हृदयात हिंदू धर्माचे हित आहे, तो विवेकानंदांच्या समाधीवर दुःखी झाल्याशिवाय राहू शकत नाही."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments