Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल

Webdunia
शनिवार, 5 जून 2021 (09:45 IST)
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाला वाचविण्यासाठी काही पावले उचल्य्याने आपल्या येणार्‍या पिढ्या या पृथ्वीवर शुद्ध हवेत श्वास घेऊ शकतील.
 
* स्वच्छता म्हणजे कचऱ्याचे उत्कृष्ट पद्धतीने निरसन करणे. कचऱ्याचा पुनर्वापर करणे, घाण न पसरवणे. कचऱ्याला रिसायकल करणे देखील गरजेचे आहे.
 
* वनस्पतीमधून निघणारे कार्बन डायऑक्साइड पृथ्वीमध्ये परत जाऊ द्यावे. कोळशापासून वीज निर्मिती करणार्‍या प्रकल्पांचा कार्बन डायऑक्साइडला वाढवून पर्यावरणाला दूषित करण्यात मोलाचा वाटा आहे. त्यांसाठी हे प्रकल्प प्रभावी ठरू शकतं. अश्या तंत्रज्ञानामुळे वीज निर्मिती वाढेल पण कार्बनच्या उत्सर्जनात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कृती अमलात आणल्याने औष्णिक प्रकल्प वाचू शकतात.
 
* ऊर्जा वाचविण्यासारख्या गोष्टी कडे लक्ष द्या जसे कमीत कमी वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर करा. कॉम्प्युटरला हायबरनेट मोड वर ठेवल्याने ऊर्जा वाचते असे काही नाही पण कार्बनचे उत्सर्जन अजून वाढते. काही काम नसल्यास कॉम्प्युटरला बंद करून ठेवावे. असे करणे सर्वांसाठीच फायदेशीर आहे. आणि संगणकासाठी देखील.
 
* वीज कमी वापरा. ग्रीन लेबलची उपकरणे वापरा,  कमी खप असलेल्या बल्बचा वापर करण्याची सुरुवात भारतात झाली असून त्यांचा किंमतींत घट करण्याची आणि अश्या प्रकल्पांना दत्तक घेण्याची गरज आहे. यासाठी घरातील वीज कनेक्शनला जोडण्यासाठी मीटर मदत करेल. दुसरीकडे ऊर्जा कार्यक्षमता विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे फ्रीज, एसी, कूलर, हीटर, इस्त्री, ओव्हन सारख्या उपकरणांवर आता ग्रीन लेबल दिसू लागले आहेत. हे लेबल हे दर्शवते की हे उपकरण किती प्रमाणात वीज वापरेल. विकत घेण्याआधी ग्रीन लेबल बघून घ्या.
 
* कमी इंधनाचे उपकरण वापरा. कधी कधी आपण उपयोगात नसलेले वाहने उपकरण आपल्या घरात ठेवत असतो. जर का ते जास्त प्रमाणात वीज आणि इंधन घेत आहे जसे की जुने स्कुटर, कार, जीप, पंखे किंवा जुनी झालेली डिझेल मोटार. जे सामान्यांपेक्षा जास्त वीज खपत करतातच त्याच बरोबर कार्बन उत्सर्जनामध्ये त्यांचा वाटा असतो तर अश्या गोष्टींना आपल्या घरातून काढून टाकावे. जेणे करून आपल्या वीज इंधन आणि पैसे वाचतील. हाताने चालणाऱ्या उपकरणांचा अधिक वापर करावा.
 
* बायोगॅस प्रकल्पाला घरी आणा. सूर्याची ऊर्जा, पवनची ऊर्जा आणि शेणापासून निर्मित बायोगॅस आणि वीज हे प्रत्येक घरात असलेलं चांगलं विकल्प आहे. हे लाकूड, गवऱ्या, आणि कोळशाच्या चुली पासून सुटका देतात. तर मग सूर्यदेव, पवनदेव आणि पशूंपासून मिळणाऱ्या शेणाचे आभार मानून बायोगॅस ऊर्जेला घरोघरी आणण्यासारखा कार्याला लागावे.
 
* भौगोलिक ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाचे विश्लेषण करा. वैज्ञानिक सांगतात की ज्वालामुखीं मध्ये वीज निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. अंदमान निकोबार सारख्या भारतीय बेटांमध्ये अनेक ज्वालामुखी जमिनीच्या गर्भात निजलेल्या अवस्थेत असून यावर विचार केला जाऊ शकतो.  हायड्रोजनचे उत्पादन आणि त्याचे संग्रह एक मोठी समस्या आहे पण हायड्रोजनाने चालणाऱ्या दुचाकी किंवा तीनचाकी वाहने हे चांगलं पर्याय म्हणून असू शकेल का, यावर विचार करावा.
 
* कमी इंधनाचा वापर करणारे वाहन वापरा. सध्या हायब्रीड वाहनांचा काळ आहे जे कमी प्रमाणात इंधन खातात. काळे विषारी धूर सोडत नाही. लाल दिवा आल्यावर आपोआप बंद होतात. आपल्या वाहनांना अश्या यंत्रणेसह बाजारपेठेत येऊ देण्याचा दिशेने कार्य करायला पाहिजेत.
 
* सार्वजनिक वाहनांचा आदर्श ठेवावा. सार्वजनिक वाहनांना सर्व सोयीसह आणि आरामशीर प्रवास करण्यासाठी उपयुक्त बनविणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर शासनाने आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वाहन भत्त्यामध्ये कपात करून घरापासून कमीत कमी अंतरावर नियुक्ती आणि बदलीचे धोरण अमलात आणून इंधन खर्चात आणि खपत मध्ये बचत करू शकतो. जवळपास जाण्यासाठी आपण सायकल देखील वापरू शकता.
 
* वीट, सिमेंट, स्टीलच्या रचना कमी करून ग्रीन फ्रेम वापराव्यात. वीट, सिमेंट आणि स्टील हे कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास जवाबदार आहे. ह्यांना बनवताना लागणाऱ्या इंधनाचे वापर जास्त न करू शकल्याने या घटकांनाच दोषी मानले जाते. या ठिकाणी हिरव्या रचना उपर्युक्त ठरतात. एखादी जागतिक आपत्ती आल्यास या कुठल्याही बांधकामाची नासाडी होते. परत ते बांधण्यासाठी खर्च करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापनाद्वारे हा खर्च रोखला जाऊ शकतो.
 
* गावाचे शहर करू नये. वाढते स्वप्न, वाढते खर्च आणि वाढणारे बाजारपेठ याचा अर्थ असे नाही की गावात आणि शहरांमध्ये भेद करू नये. त्यासाठी शहराला गावासारखं बनवा, गावाला शहर बनू देऊ नका.
 
* पॉलिथिनचा वापर करू नये. पॉली कचरा आणि ई कचरा हे दीर्घकालीन विष आहे. हे जाळणे आणि माती खाली पुरणे हे विषारी आहे. सहस्त्र वर्षानंतर आपल्या वंशजांनी जमीन खणल्यावर त्यांना कचरा दिसला तर आपला समजा असभ्य असल्याचे कळून येईल. पॉलिथिनच्या ऐवजी कागदाचा वापर करावा आणि आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

ग्रँडमास्टर डी गुकेश जगज्जेता बनला, बक्षीस म्हणून इतके कोटी रुपये मिळाले

पुढील लेख
Show comments