रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था गरजूंना आपातकाळी सेवा देते. संस्था रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे कार्य करते.
रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेनरी ड्यूनेन्ट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिनाला संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरे केले जाते. जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन म्हणून देखील साजरे केले जाते. ही संस्था तब्बल 150 वर्षांपासून काम करीत आहे. ही संस्था नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत आहेत.
भारतात वर्ष 1920 मध्ये पार्लियामेंट्री एक्टच्या अंतर्गत भारतीय रेडक्रॉस समितीचे गठन केले गेले. तेव्हापासून रेडक्रॉसचे स्वयं सेवक आपली निःस्वार्थ सेवाभाव करीत आहेत. विश्वाचे तब्बल 200 देश एकाच विचारांवर ठाम आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्था नैसर्गिक आपदा मध्ये अडकलेले लोकांना तसेच युद्धामध्ये घायाळ झाले असलेल्या वीरांना मदतीचा हात देऊन त्यांना यथोचित साहाय्य करतात.
रेडक्रॉस चा मुख्य उद्देश्य रुग्णाची, युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांची सेवा करणे आहे. सन 1919 पासून रेडक्रॉस मानवाचा त्रास कमी करण्या कडे विशेष लक्ष देत आहे. हेन्रीने सेवाकार्यासाठी या समितीला रेडक्रॉस नाव दिले. या समितीची ओळख पटण्यासाठी एका पांढऱ्या पट्टीवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हाला मान्य करण्यात आले. आता हे चिन्ह संपूर्ण विश्वाला मानवासाठी केलेली निःस्वार्थ सेवाभाव म्हणून ओळखले जाते.
सध्याच्या काळात 186 देशांमध्ये रेडक्रॉस समिती कार्य करीत आहे. 1901 साली हेनरी ड्यूनेन्ट यांना त्याचा सेवा भाव साठी पहिले नोबल शांती पारितोषिक देण्यात आले. विश्वाचे पहिले ब्लड बँक (रक्त पेढी) अमेरिकेमध्ये 1937 साली उघडलेले गेले. आजच्या काळात जगातील जास्तीच जास्त ब्लड बँक (रक्त पेढी) रेडक्रॉस आणि त्यांचा सहयोगी संस्था राबवतात आहे. रेडक्रॉस संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे हजारो लोकं थॅलेसेमिया, कर्करोग, आणि रक्ताल्पता (एनिमिया) सारख्या आजारापासून वाचत आहे.