Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जागतिक रंगभूमी दिन विशेष : जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमीचा इतिहास

जागतिक रंगभूमी दिन विशेष : जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमीचा इतिहास
, रविवार, 27 मार्च 2022 (11:42 IST)
दरवर्षी 27मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. 
 
हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे.यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते.1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
 
रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. 
 
वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.
 
पूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिले आणि रंगभूमी बहरून निघाली.
 
महात्मा फुले यांच्या लेखणीतून निर्माण झालेली भारतीय नाट्य परंपरा आजही बहरत आहे. समाजाला दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. 
 
बालरंगभूमीने नाटय व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत.मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. 
 
मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. मराठी रंगभूमीला वाचविण्यासाठी त्याचा उद्धार केला पाहिजे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल परब हे उद्धव ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे नेते कसे बनले?