Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BECIL Recruitment 2022:या 500 पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी

Webdunia
बुधवार, 19 जानेवारी 2022 (13:13 IST)
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने इन्व्हेस्टर आणि सुपरव्हाईजर  पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार BECIL इन्व्हेस्टिगेटर रिक्रूटमेंट 2022 साठी अधिकृत वेबसाइट becil.com वर 25 जानेवारी 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण 500 रिक्त पदांची भरती केली जाईल. त्यामध्ये इन्व्हेस्टीगेटरच्या 350 तर सुअरव्हायजेरीच्या 150 पदांचा समावेश आहे. इन्व्हेस्टीगेटर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 24,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. तर, सुपरव्हाईजर पदासाठी निवडलेल्या, उमेदवारांना दरमहा 30,000 रुपये पगार मिळेल.
 
पात्रता -
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टीगेटर आणि सुपरव्हाईजर पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला संगणक आणि स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असावे. याशिवाय या पदांवर भरतीसाठी उमेदवाराचे कमाल वय 50 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.  सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
 
अर्ज प्रक्रिया -
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सर्व पात्र उमेदवार त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रे या ईमेल आयडीद्वारे projecthr@becil.com वर पाठवू शकतात. अर्ज करण्यासाठी, सामान्य, ओबीसी आणि माजी सैनिक उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी / एसटी, ईडब्ल्यूएस  आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना 350 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी उम्मेदवारांनी अधिकृत वेबसाइट तपासा.
 

संबंधित माहिती

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुढील लेख
Show comments