Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या क्षेत्रात मिळतो भरपूर पगार, सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकऱ्या

Webdunia
शुक्रवार, 8 जुलै 2022 (16:44 IST)
Highest Paid Jobs: प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. पण सर्वांचीच अपेक्षा पूर्ण होते असे नाही. काहींची करिअर निवड करण्याचा निर्णय चुकीचा असू शकतो. 10 वी आणि 12 वी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी संभ्रमात असतात की त्यांनी कोणत्या विषयाची निवड करावी जेणे करून भविष्यात त्यांचे उत्तम करिअर बनावे आणि त्यातून त्यांना चांगल्या पगाराची उत्तम नोकरी मिळावी. यंदाच्या वर्षी 2022 मध्ये कोरोनाच्या कालांतरानंतर चांगला पगार मिळवून देण्याऱ्या नोकऱ्या आहे. चला जाणून घेऊ या.
 
1 डेटा सायंटिस्ट-
सध्या डेटा सायंटिस्टच्या (Data Scientist) नोकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे आणि यामध्ये भरपूर पगार ही मिळतो.पण डेटा सायंटिस्टचे कार्य सोपे नसतात. या साठी उमेदवाराचे गणित, सांख्यिकीय संकल्पना आणि कॉम्युटर प्रोग्रामिंगसह अनेक कौशल्यांवर कमांड असणं आवश्यक आहे. गणित आणि कॉम्प्युटर कोडिंगच ज्ञान असल्यास आपण या क्षेत्रात नोकरी करू शकता. डेटा सायंटिस्टचे काम कपंनीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, आर्किटेक्चर, आणि कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा डेटा हाताळणाऱ्या सिस्टमला बनवतात. 
 
2 आयटी सुरक्षा व्यवस्थापक (IT Security Manager)-
मोठ्या ऑफिसात, बँकात डेटा आणि सिस्टीम सुरक्षित ठेवण्यासाठी आयटी सुरक्षा व्यवस्थापकची गरज असते. हा व्यवस्थापक इंटरनेटवरील सर्व माहिती सुरक्षित ठेवण्याचं काम बघतो. हे काम खूप जोखीमच असल्यामुळे मोठ्या आयटी कंपन्या चांगला पगार देतात. या सत्ताही टेक्निकल नॉलेज असणं आवश्यक आहे. 
 
3 मोबाईल अ‍ॅप डेव्हलपर-(Mobile app developer)
आज आपण मोबाईल आणि इंटरनेट शिवाय राहू शकत नाही. हे आपली गरज आहे. या मुळे मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपर(Mobile app developer)ला मागणी आहे. सध्या मोबाईल कंपन्या आपल्या अ‍ॅपद्वारे लोकांना सेवा देत आहेत. ग्राहकांकडून त्याची मागणी देखील वाढल्यामुळे सध्या मोबाईल अ‍ॅअॅप्लिकेशन डेव्हलपरला चांगली मागणी आहे. त्यांना चांगले पैसे मिळतात. या क्षेत्रात काम करण्यासाठी  iOS आणि Android सारख्या प्लॅटफॉर्मवर अॅप्स कसे तयार करायचे, वेब डेव्हलमपमेन्ट, लॅंग्वेज, मोबाईल फ्रेमवर्क, आणि कोडिंगचे ज्ञान असणे महत्वाचे आहेत. 
 
4 डिजिटल मार्केटिंग -(Digital marketing)
आज संपूर्ण जग मोबाईल, ऑनलाईन आणि इंटरनेट वर अवलंबून आहे. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग(Digital marketing) महत्त्वाचे आहे. आज जगभरात प्रत्येक क्षेत्रात डिजिटायझेशन झाले आहे. आज सर्व ग्राहक डिजिटल मीडियावर आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी डिजिटल मार्केटिंगचा उपक्रम सुरु केला आहे. या क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक पर्याय आहे कारण या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता आवश्यक नसते. यामध्ये डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट, कंटेंट मॅनेजर, सर्च इंजिन मार्केटर, वेब डिझायनर, एसइओ एक्झिक्युटिव्ह, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमायझर, कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता. बारावी उत्तीर्ण केल्यावर किंवा पदवीधर उमेदवार या क्षेत्रात काम करून चांगले पैसे मिळवू शकतो. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

वाट पाहणारं दार

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

पुढील लेख
Show comments