Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवडता आणि प्रभावी परफ्यूम कसा निवडायचा?

Webdunia
सोमवार, 10 एप्रिल 2023 (15:19 IST)
आजकाल बाजारात एकापेक्षा एक वरचढ असे अनेक परफ्यूम उपलब्ध असतात. पण, यामध्ये आवडता आणि तितकाच प्रभावी परफ्यूम कसा निवडायचा? हा एक गुंताच. अनेकजण योग्य परफ्यूम कसा निवडावा याबाबत संभ्रमात असतात. हा संभ्रम दूर होण्यासाठी आम्ही काही टिप्स आपल्याला सांगत आहोत. परफ्यूम खरेदी करताना या टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल...
 
अधिक कॉन्सन्ट्रेट आणि लाँग लास्टिंग
जाणकारांच्या मते परफ्यूमच्या लेवलवर ईडीपी आणि ईडीटीचा उल्लेख केलेला असतो. तुमच्यासाठी ईडीपीवाला परफ्यूम खरेदी करणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ईडीपीवाला परफ्यूम अधिक कॉन्सन्ट्रेट आणि लॉंग लास्टिंग असतो.
 
असा निवडा सुगंध
कोणत्याही प्रकारच्या सुगंधाचा परफ्यूम निवडण्यापूर्वी तो एखाद्या छोट्या स्ट्रिपवर लावून तो हुंगून पाहा. त्यानंतरच तो आपल्या बॉडीला लावा आणि मग पाहा त्याचा दरवळ किती काळ राहतो. जर स्ट्रिपवरचा सुगंध 5 ते 10 मिनिटांपर्यंत राहिला तर समजून जा की, तो परफ्यूम तुमच्यासाठी योग्य आहे.
 
कॉफीच्या बियांचा वापर करा..
सुगंधाची पडताळणी करण्यासाठी जात असताना कॉफीच्या बियाही सोबत ठेवा. कारण, अनेकदा वेगवेगळे सुगंध घेतल्यावर गोंधळ उडू शकतो की, कोणत्या परफ्यूमचा सुगंध कोणता आहे. अशा वेळी कॉफीच्या बिया आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण, कॉफीच्या बिया तुमच्या वास घेण्याच्या शक्तीला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे तुम्ही एकापाठोपाठ 3 ते 4 सुगंध घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचा गोंधळही कमी होतो.
 
शरीराच्या विविध अवयांचा वापर करा..
परफ्यूमचा सुंगध ट्राय करण्यासाठी केवळ तो आपल्या मनगटावरच लावू नका. तर, शरीराच्या विविध अवयवांचाही वापर करा.
 
आपल्या आवडीला महत्त्व द्या  
परफ्यूमवर असलेल्या लेबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून तुमचे मत ठरवू नका. तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य द्या. जो सुगंध तुम्हाला आवडेल तोच निवडा.

संबंधित माहिती

गडकरींनी अडवाणी, जोशी यांचे आशीर्वाद घेतले, माजी राष्ट्रपती कोविंद यांचीही भेट घेतली

राज्यसभा उपनिवडणुकीमध्ये अजित पवारांनी पत्नी सुनेत्राला बनवले उमेदवार, मुंबईमध्ये दाखल केले नामांकन

NEET : 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द होणार, विद्यार्थ्यांसमोर पुनर्परीक्षेचा पर्याय

कुवेत: मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत

Human Finger In Ice Cream in Mumbai डॉक्टरांनी आईस्क्रीम ऑर्डर केली, पॅकिंग उघडले तेव्हा एक मानवी बोट सापडले

ब अक्षरवरून मुलींची नावे व अर्थ

India Post Recruitment 2024 : 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय टपाल विभागाने या पदांसाठी नियुक्ती काढली, वेतन 63 हजार रुपयांपर्यंत असेल

तासन्तास टॉयलेटमध्ये बसत असाल तर दह्यात मिसळून खा या 5 गोष्टी

काही मिनिटांतच काळी मान चमकेल, फक्त हे 5 घरगुती उपाय करा

Career Tips: 12 वी नंतर तुम्ही गेमिंग इंडस्ट्रीमध्ये उत्तम करिअर करा

पुढील लेख
Show comments