Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Colored jewelry in fashion सध्या ट्रेंडध्ये आहे 'ही' ज्वेलरी

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2024 (07:00 IST)
Colored jewelry in fashion दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. सध्या स्त्रिया ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या दागिन्यांकडे आकर्षित होताना दिसतात. मग मॅचिंग ड्रेसेसनुसार दागिनेही मॅचिंग केले जातात. पण सध्या कलर्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सुरू आहे. ज्वेलरी डिझाइनर्सही या दागिन्यांच्या वाढत्या मागणीला पाहून नियॉन आणि फ्लोरोसेंट कलर्ड ज्वेलरींवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. परंतु हे दागिने वापरण्याआधी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. कलर्ड डायमंड स्टोन असलेली डायमंड ज्वेलरी कधीही आणि कोणत्याही निमित्ताने तुम्ही वापरू शकता.

कलर्ड ज्वेलरी वापरताना आपल्या ड्रेससोबत ती ज्वेलरी मॅच होत आहे ना? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर ड्रेसचा रंग वेगळा आणि ज्वेलरीचा वेगळा असेल तर त्यामुळे तुमचा लूक बिघडण्याची शक्यता असते. जर हलक्या किंवा पेस्टल रंगांच्या ड्रेससोबत तुम्हाला ज्वेलरी वेअर करायची असेल तर मल्टी कलर्ड फ्लोरोसेंट नेक पीस तुमच्यासाठी हटके पर्याय ठरेल. एका रंगाच्या कपड्यांसोबत मल्टी कलर्ड ज्वेलरी वापरता येऊ शकते. तुमच्या ड्रेसिंगवर जर तुम्ही एखादा ज्वेलरी सेट घालणार असाल तर त्यामध्ये एकच पीस हेव्ही असणं गरजेचं आहे. जर तुमच्या गळ्यातील नेक पीस हेव्ही लूक देणारा असेल तर त्यावर हलक्या कलरच्या बांगड्या किंवा रिंग वापरावी. 
फ्लोरोसेंट रंगाची ज्वेलरी कॅज्युअल ड्रेसेस, डेनिम्स आणि स्कट्‌र्सवर सूट होते. एथनिक वेअरवर हेव्ही प्रेशियस स्टोन ज्वेलरी वापरू शकता. इंडो वेस्टर्न ड्रेससोबत फक्त एक प्रेशियस स्टोन असलेला स्टेटमेंट पीस तुम्हाला हटके लूक देण्यास मत करेल. 
 
पार्टीमध्ये जाण्यासाठी तयार होत असाल तर एका चेनसोबत मल्टी कलर्ड स्टोनचं पेंडेंट फार सुंदर लूक देईल.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Mother's Day 2024: मातृदिनाचा इतिहास जाणून घ्या

घरीच बनवा थंडगार लौकीची रबडी, रेसिपी जाणून घ्या

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

पुढील लेख
Show comments