पांढरा रंग हा दिसायला छानच दिसतो. हा घातल्यावर चेहऱ्यावर एक तेज दिसतो. आपण देखील या रंगांचा समावेश आपल्या कपाटात बाकीच्या रंगांसह करू इच्छित आहात तर या टिप्स अवलंबवा.
* मोनोक्रोम व्हाईट लूक -
आपण व्हाईट टॉपसह मॅचिंग प्लाझो देखील घालू शकता. ऑफिस किंवा आउटिंग लूक ला वेगळे करायचे असेल तर एम्ब्रॉयडरी क्रॉप,ऑफ शोल्डर किंवा वन शोल्डर टॉपसह प्लाझो देखील घालू शकता. आपण पांढऱ्या मोनोक्रोम लुकसह फिकट जांभळी, गुलाबी किंवा पीच रंगाचे आयशॅडो आणि लिपस्टिक छान दिसेल.
* पांढरा शर्ट विथ लेदर स्कर्ट -
आपण पांढऱ्या रंगासह लेदर स्कर्ट किंवा पॅन्ट घालण्याचा विचार करत आहात तर यासाठी आपण लाल किंवा काळ्या रंगाची निवड करू शकता. या लाल आणि पांढऱ्या सह लाल लिपस्टिक लावू शकता. गडद आय मेकअप करणे टाळा कारण लाल स्कर्ट आधीच उठून दिसते. या ड्रेस वर आपण सोनेरी लेयर्ड नेकपीस आणि इयरिंग घालून पार्टी लूक देऊ शकता.
* पांढरी नेट साड़ी लूक-
ट्रेडिशनल ड्रेस परिधान करण्यासाठी आपण पांढरा नेट ब्लाऊजसह नेट साडी घालू शकता. आपण ऑफ शोल्डर किंवा बेल स्लीव्हज ब्लाऊज बनवू शकता. या वर आपण न्यूड पिंक लिपस्टिक आणि आयशॅडो लावू शकता. सिल्व्हर बँगल्स आणि इयरिंग देखील घालू शकता. हे आपल्याला चांगले आणि वेगळे लूक देईल.
* काळा पांढरा ड्रेस-
बर्थडे किंवा एखादा लहान समारंभ असल्यास आपण ब्लॅक डॉट किंवा कोणतेही वेगळे स्टार चे डिझाइन चा ड्रेस निवडू शकता. या ड्रेस सह डार्क स्मोकी आय लूक आणि ब्राऊन लिपस्टिक लावू शकता. किंवा लाल लिपस्टिक सह फिकट आयमेकअप करू शकता. या मध्ये आपण खूप वेगळे दिसाल.
* पांढरा ड्रेस आणि सिल्व्हर दागिने-
आपण पांढऱ्या रंगाच्या ड्रेस किंवा साडीसह सिल्व्हर ज्वेलरी घालू शकता. या वर आपण रेड,पिंक किंवा पीच रंगाची लिपस्टिक लावल्यावर सुंदर दिसाल.