स्त्री असो किंवा पुरुष दोघांचा ड्रेसिंग मध्ये जीन्स समानच असते.त्यामध्ये अंतर असतो तो डिझाइनचा. जीन्स घालणे प्रत्येकासाठी एक सोपे पर्याय आहे.कारण कुर्ता,टॉप,किंवा शर्ट कशा सह ही घातली जाते. तथापि, त्याचे काही नियम देखील आहेत विशेष करून पुरुष किंवा मुलं जीन्स घालताना काही चुका करतात, अशा परिस्थितीत आपण देखील अशा चुका तर करत नाही हे जाणून घेऊ या.
जीन्स ,मध्ये दोन पॅटर्न सर्वात जास्त पसंत केले जाते. स्लिम फिट आणि स्किनी. स्लिम फिट जीन्स ही चांगली फिटिंग देते परंतु आपल्या त्वचेला चिटकून बसत नाही. तर स्किनी जीन्स ही फिट असते जी आपल्या त्वचेला चिटकून बसते. जर आपण सडपातळ आहात आणि उंच आहात तर स्किनी जीन्स वापरणे टाळावे.
* एंकल जीन्स किंवा क्रॉप जीन्सची लांबी एंकल पर्यंत असावी कमी किंवा जास्त नको.परंतु कधी कधी मुलं एंकल जीन्स एंकल पेक्षा मोठी घालतात असं करणे टाळा.
* जीन्स सह टीशर्ट शर्ट काहीही घालू शकता. परंतु लक्षात ठेवा की फिटनेस चांगली नसेल तर शर्टच परिधान करा. टीशर्ट घालायची असल्यास सैल घाला टक इन करू नका.
* कधी-कधी जीन्स सह घातलेले फुटवेयर देखील जुळत नाही हे देखील आपल्या लुकला खराब करू शकते. नेहमी लक्षात ठेवा की स्नीकर्स किंवा स्पोर्टी शूज देखील चांगले दिसतात. रंगाचे समायोजन करू शकता परंतु फुटवेयर निवडताना काळजी घ्या.