Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोनोक्रोम ड्रेस कसे परिधान करावे?

Webdunia
बुधवार, 31 जुलै 2019 (10:39 IST)
मोनोक्रोमॅटिक लुक स्टायलिश आणि सुपर ट्रेंडी लुकसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मोनोक्रोम हि एक रंगसंगती आहे, जी बदलत्या मोसमावर आधारित नसते, तर ती रंगावर अवलंबून असते. या सीझनमध्ये क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट लूकला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाता येईल. काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि चेकबोर्डस किंवा पट्टे मॉडर्न लुक देतात. या रंगाची रंगसंगती सहज आणि आकर्षक असल्याने ती कोणत्याही रंगाच्या व्यक्तीसाठी उठून दिसते.
 
पांढऱ्या आणि काळ्या मोनोक्रोमच्या पलीकडे : पूर्ण काळे किंवा पांढरे रंगांचे कपडे परिधान करणे सर्वात सोपे आहे. आणि ते राखाडी रंगासोबत सुद्धा परिधान करू शकतो. क्रोनिकल स्टाईल शरीरावर छान दिसण्यासाठी मुख्य शरीराच्या आकारानुसारच त्याची रचना केली जाते.
 
ठळक रंगांचे मोनोक्रोम : टोन आऊटफिट्स पाहताच क्षणी खूप छान वाटू शकतात, विशेषत: जर ते भडक रंगाचे असतील तर, त्यासोबत अॅक्सेसरीज शोभून दिसेल अशीच असावी. जेव्हा लाल रंग ड्रेसच्या वरच्या भागावर असते तेंव्हा तेंव्हा त्यासोबत तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचे आऊट फिट्सहि वापरू शकता. हे ठळक रंग सर्वमान्य आनंददायक आहेत आणि कोणत्याही बूट सोबत सूट होतात.
 
सर्वच कॅमल रंग सारखेच नसतात: काही कॅमल रंग अधिकच पिवळे असतात, तर इतरांना राखाडी रंग हि असतात. एखाद्या बॉसप्रमाणे या मोनोक्रोम ट्रेंडला तुम्ही वापरू शकता, ऑफ ब्राउन छटा शोधून काढा ज्या तुम्हाला सूट करतील आणि आपल्या इच्छेनुसार हवे ते रंग जुळवून पाहू शकता. मस्टर्ड एक उत्कृष्ट पण अत्यंत अंडररेटेड रंग आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्ही मखमली रंगाची शेड सुद्धा वापरू शकता.
टेक्श्चर (पोत ) : वस्त्राची वीण (बनावट) हि कोणत्याही मोनोक्रोम लुकचा आत्मा आहे. वेगवेगळ्या कापडा सोबत वेग-वेगळे रंग , जसे कि डायमेंशनल वेल्व्हेट्स आणि चमकदार सॅटिन या मध्ये समावेश करता येईल.
 
सूट : मोनोक्रोम लूक मध्ये आणखी अट्रॅक्टीव्ह दिसण्यासाठी इच्छुक असल्यास सूट हा दुसरा उत्तम पर्याय आहे. समान रंगाचा एक हलका ब्लाउज त्यावर आणखी उठून दिसेल. टॉप कॉन्ट्रास्टींग टेक्श्चरसह जोडलेले असल्यास किंवा सूक्ष्म प्रिंट वापरल्यास ते आणखी चांगले दिसते.
 
आपले आवडते रंग निवडणे आणि त्यांचा वापर करणे किंवा त्यांच्याबरोबर प्रयोग करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पोत समाविष्ट करणे आणि विशिष्ठ आराखड्यात बनविल्या गेलेल्या भिन्न प्रकारांच्या कापडामुळे खोली, माप, विशिष्टता आणि रुची वाढविण्यात मदत होऊ शकते. इथे आणि तिथे सर्वत्र असलेल्या या ट्रेंडसह आपण सहजपणे प्रयोग करू शकता जस कि, लेस, लेदर, फर, पंख, भरतकाम, पॅटर्न्स, सजावट इत्यादी. मोनोक्रोमॅटिक ट्रेंड स्ट्रीट फॅशन आणि पार्टी मध्ये सुद्धा आपली वेगळी छाप पडण्यास मदत करते, आता महत्त्वपूर्ण हे आहे कि तुम्ही कशाप्रकारचे रंग संगती निवडता.

श्री. नेल्सन जाफरी, डिजाईन हेड ऑफ बिरला सेलूलोज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments