Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नव्या जोडीदारात आपण आपल्या 'एक्स'ला शोधतो का?

Webdunia
बुधवार, 31 जुलै 2019 (09:55 IST)
स्टेनली गेन्स
ब्रेकअपनंतर तुम्ही अनेकांना हे म्हणताना ऐकलं असेल की ती माझ्या टाईपची नव्हती किंवा तो माझ्या टाईपचा नव्हता. तिचा आणि माझा स्वभाव जुळत नव्हता.
 
काही जण तर एक-दोन डेट्समध्येच ती/तो माझ्या सारखी/सारखा नाही, असं म्हणतात.
 
नातेसंबंधाच्या या नव्या युगात 'माझ्या टाईप'च्या जोडीदाराचा शोध अंतहीन आहे. मात्र, कुणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगात 'माझ्या टाईप'सारखी गोष्ट खरंच अस्तित्वात आहे का?
 
यासंबंधी नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. यात असं आढळलं की आपण वयातलं अंतर, शिक्षण, केसांचा रंग आणि त्यांची लांबी या आधारावर आपला जोडीदार निवडतो. मात्र, आपण आपल्या स्वभावाशी साधर्म्य असणारा जोडीदार शोधतो, याचे पुरावे या सर्वेक्षणात मिळाले नाही.
 
असं असलं तरी आणखी एका संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की तुम्ही तुमच्या स्वभावाचा जोडीदार शोधत असाल तर तुम्हाला आरशात बघण्याची गरज आहे.
जर्मनीमध्ये 12 हजारांहून जास्त लोकांवर जवळपास 9 वर्षं हे संशोधन करण्यात आलं. यात त्याच लोकांचा समावेश करण्यात आला जे मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे होते. जे नवनवीन अनुभवांसाठी तयार होते. ज्यांना इतरांचं बोलणं सहज पटायचं आणि जे प्रामाणिक होते.
 
संशोधन करणाऱ्या पथकाने या लोकांच्या रोमँटिक संबंधांवर 9 वर्षं लक्ष ठेवलं. या लोकांना हेदेखील सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या जोडीदारालाही या संशोधनाचा भाग व्हायला सांगावं.
 
9 वर्षांनंतर या संशोधनात केवळ 332 अशा व्यक्ती उरल्या ज्या कमीत कमी 2 रोमँटिक नात्यात गुंतल्या होत्या. इतक्या मोठ्या सर्व्हेमध्ये केवळ 332 व्यक्तीच एकाहून जास्त रोमँटिक नात्यात असणं, आश्चर्याची बाब होती. मात्र, यावरून संशोधक ठोस निष्कर्षावर येऊ शकले. या 332 लोकांनी त्यांच्या वर्तमान जोडीदाराची तिच वैशिष्ट्यं सांगितली जी त्यांच्या जुन्या पार्टनरमध्ये होती.
 
याचा अर्थ असा होता की संशोधनात सहभागी असणाऱ्या व्यक्तींना हे वाटत असलं की आपल्या जोडीदाराविषयी असलेल्या त्यांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. तरी वास्तवात मात्र, ते आपल्या जोडीदारात विशिष्ट गुण शोधत होते आणि हा गुण त्यांना त्यांच्या पहिल्या जोडीदारात मिळाला होता आणि दुसऱ्या जोडीदारातही मिळाला आणि याच गुणामुळे ते दुसऱ्या पार्टनरशी जुळवून घेऊ शकले.
 
'आपल्या टाईप'चा जोडीदार का शोधतो?
तुम्हाला ही बाब मान्य होवो अथवा न होवो, एक गोष्ट मात्र खरी आहे. तुम्ही जोडीदार शोधत असाल तर असं होऊ शकतं की तुम्ही अशी व्यक्ती शोधता जिच्यात तुमच्या पहिल्या म्हणजेच तुमच्या 'एक्स'चेच गुण असतील आणि तसे स्वभावगुण असलेली व्यक्ती तुम्हाला सापडल्यावर तुमचं तिच्याशी सहज सूत जुळतं.
 
विशेष म्हणजे जर्मनीत जे संशोधन झालं त्यात जोडीदाराचे गुण तर जुळलेच. मात्र, अनेकांचे तर जोडीदारही तेच होते. म्हणजेच जुनेच.
 
आपल्या जोडीदारात आपल्यासारखेच गुण शोधणं असामान्य बाब नाही. आपल्या सर्वांचंच आपल्या आसपासच्या त्याच व्यक्तींशी पटतं ज्यांच्याशी आपले विचार आणि आपल्या सवयी जुळतात. अशा संबंधांमध्ये तुम्हाला तुमचे विचार आणि सवयी बदलायची गरज पडत नाही.
 
असं असलं तरी काही लोक असे असतात जे नवनवीन प्रयोग करण्यासाठी वेगवेगळ्या जोडीदारांसोबत वेळ घालवून त्यांना आजमावतात. संशोधनात असंही आढळलं की बहिर्मुखी म्हणजेच सोशलायझर व्यक्तींची त्यांच्याचसारख्या स्वभावाच्या व्यक्तीशी सूत जुळण्याची शक्यता खूप कमी असते.
 
एकूण काय तर, आपण आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडलं आणि आपण खुल्या विचारांचे असू तर आपण आयुष्यात नवनवीन जोडीदारांचाही अनुभव घेऊ शकतो, जेणेकरून जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन आपल्याला मिळू शकेल.
 
संशोधनाचा फायदा
या संशोधनामुळे ऑनलाईन डेटिंगसाठीही नव्याने आशा निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ संगीत ऐकवणारे अॅप तुम्हाला तुमच्या आवडीचं संगीत ऐकवतात. अगदी त्याच पद्धतीने डेटिंग अॅपदेखील तुम्हाला तुमच्या स्वभावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीच तुम्हाला सुचवतील.
 
मात्र, अशी नाती किती काळ टिकली, हे या संशोधनातून कळलेलं नाही. त्यामुळे एखादं नातं किती दिवस टिकेल, याची काहीच खात्री देता येत नाही.
 
आपल्या जोडीदाराशी अनेक बाबतीत असलेलं साधर्म्य तुमच्या विकासात अडथळा ठरू शकतो. तुम्हाला भेटण्याआधी तुमच्या जोडीदाराचं जुनं नातं असेल तर तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं. कारण नव्या जोडीदाराचे गुण जुन्या जोडीदाराशी जुळणारे असतील तर हे तुमच्यासाठी काळजीचं आणि खेदकारकच म्हणावं लागेल.
 
हेच सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर असंही म्हणू शकता की तुमच्या विद्यमान जोडीदाराचा स्वभाव तुमच्या पहिल्या जोडीदाराशी जुळणारा असेल तर त्याच्याशी घट्ट नातं निर्माण करणं, तुलनेने सोपं जाईल.
 
त्यामुळे आता वाढत्या घटस्फोटांसाठी याला दोष देऊ नका की लोकांना 'त्यांच्या टाईप'चा जोडीदार मिळाला नाही.
 
तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा शोध घेणं थांबवायला हवं, असा या संशोधनाचा अर्थ अजिबात काढू नका. काहीही असलं तरी जोडीदाराची निवड करताना अनेक मुद्दे महत्त्वाचे असतात आणि अनेक मुद्द्यांचा परिणाम होत असतो.
 
मात्र, तुमचं नवं 'रिलेशनशीप स्टेटस' पहिल्यासारखंच असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, एवढंच हे संशोधन सांगतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments