Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

राष्ट्रीय विज्ञान दिन

National Science Day 2020
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (18:47 IST)
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय यांचा संयुक्त विद्यमानाने दर वर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो आणि विज्ञानाच्या फायद्या विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान विषयी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्यासाठी उद्देशून साजरा होतो. 28 फेब्रुवारी 1928 ला सर सी. व्ही. रमणं याने त्यांचा शोध जाहीर केला.ह्यासाठी  त्यांना 1930 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञानदिनाचे  मूळ उद्देश्य तरुण विद्यार्थींना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि आकर्षित करणे आहे. त्याच बरोबर विज्ञान आणि वेज्ञानिककृतीसाठी सर्वसामान्य जागृती निर्माण करणे आहे. या दिवशी राष्ट्रीय आणि इतर प्रयोगशाळेत, विज्ञान अकादमीशाळेत, महाविद्यालयात, प्रशिक्षणसंस्थेत विविध वैज्ञानिक उपक्रमांशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, नाटक, निबंध, विज्ञान क्विझ, विज्ञान प्रदर्शनं, वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित केले जाते. राष्ट्रीय व इतर पुरस्कार या क्षेत्रात विशेष योगदान म्हणून जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षीशे ठेवली जाते. (नॅशनल सायन्स डे) राष्ट्रीय विज्ञान दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो.   
28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमणं यांचा शोधाचा पारावार झाला. या निमित्ताने भारतात 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिन "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती होण्याची नितांत गरज आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स