Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sane Guruji Suvichar In Marathi साने गुरुजी यांचे विचार

Webdunia
शुक्रवार, 11 जून 2021 (09:29 IST)
आईचे प्रेम जिथे असेल
ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,
हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने
म्हणजे स्मशानेच होत.
 
आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,
वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे
त्यांना कोणीच देत नाही,
मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
 
आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे,
मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
 
एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले
तरी ते जवळच असतात.
 
करी मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी तयाचे.
 
कला म्हणजे परमोच्च ऐक्य.
कला म्हणजे सत्य,
शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
 
कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,
पण पैसा हि आजची भाकर आहे.
 
जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व
ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
 
जिकडून जे घेता येईल,
ज्यांच्यापासून जे शिकाता येईल
ते आदराने घ्या.
 
जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील?
लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?
 
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,
असत्य असते ते अदृश्य होते.
 
ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,
वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,
ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
 
ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,
ती काय माणसे म्हणायची.
 
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते
पण दुसऱ्या करिता रडणे
फार कठीण असते,
त्याला अंत:करण असावे लागते.
 
निर्बालांना रक्षण देणे
हीच बाळाची खरी सफलता होय.
 
भूतकाळातील काही गोष्टी आता
चुकीच्या वाटल्या तर
त्या दूर न करणे म्हणजे
भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी
जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.
तो भूतकाळाचा गौरव नाही.
तो पूर्वजांचा गौरव नाही.
उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
 
ध्येय सदैव
वाढतच असते.
 
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते
दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.
 
निसर्गावर प्रेम करा,
निसर्ग आपली माता आहे.
 
मेघ सारे पाणी देवून टाकतात,
झाडे फळे देवून टाकतात,
फुले सुगंध देवून टाकतात,
नद्या ओलावा देवून टाकतात,
सुर्य चंद्र प्रकाश देतात
जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.
 
हृदयात अपार सेवा भरली कि
सर्व मित्रच दिसतात.
 
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
 
सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे
बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या
राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
 
मोतांच्या हारापेक्षा
घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.
 
प्रेमाचे नाते
सर्वात थोर आहे.
 
सदाचार हा मनुष्याचा
खरा अलंकार आहे.
 
सुधारणा करण्याचे
अनेक मार्ग असतात.
 
भेदावर अभेद
हेच औषध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जास्वंदा पासून बनवलेल्या कंडिशनरने केसांना चमक आणा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळा विशेष रेसिपी : मटारचे पराठे

नियमित मल्टीविटामिन घेणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?

पुढील लेख
Show comments