Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिथुन राशीत सूर्य राहू नंतर शुक्राचा प्रवेश

Webdunia
29 जून रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत असून तो वृषभापासून मिथुन राशीत पोहोचणार आहे. मिथुन राशीत अगोदरच राहू आणि सूर्य विराजमान आहे. व्यक्तीच्या जीवनात प्रेम तथा फायद्यासाठी शुक्र ग्रह महत्त्वपूर्ण असतो. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. आता मिथुन राशीत शुक्र, सूर्य आणि राहूचे एकत्र आल्याने सर्व 12 राशींवर याचा प्रभाव जरूर पडेल. तर जाणून घेऊया शुक्र ग्रह कोणत्या राशीसाठी सर्वात जास्त लाभदायक ठरेल आणि कोणासाठी नुकसानदायक.  
 
मेष : मेष राशीसाठी शुक्राचा हा गोचर यशासोबत धनयोग देखील बनवत आहे. या दरम्यान तुम्हाला स्वत:वर गर्व जाणवेल. तुमच्यात सहयोगाची भावना वाढेल. कामासाठी प्रवास करावा लागेल जो यशस्वी ठरेल.  
 
वृषभ : वृषभ राशीतून निघूनच शुक्र मिथुन राशीत जात आहे. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास वाढेल. तुमच्या आर्थिक स्थितीला योग्य बनवण्यासाठी तुम्ही काही        आयडिया विचार करू शकता. तुमची लव्ह लाईफ चांगली राहणार आहे. शुक्राच्या गोचरामुळे पार्टनरसोबत तुमच्या संबंधांमध्ये सुधारणा येईल.  
 
मिथुन : शुक्राचा गोचर मिथुन राशीत होणार आहे. आर्थिक रुपेण ही वेळ तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. जे जातक आपल्या वैयक्तिक जीवनात जोडीदाराची वाट बघत आहे त्यांना यात यश मिळेल. तुमच्या जीवनात कोणी महत्त्वाची व्यक्ती येणार आहे.   
 
कर्क : या गोचरामुळे तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हे खर्च कदाचित तुमच्यासाठीच राहतील पण घरातील वातावरण उत्तम राहणार आहे. पैशांमुळे तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. लव्ह लाईफ चांगली राहील.  
 
सिंह : सिंह राशीच्या जातकांसाठी हा गोचर लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासाठी स्थिती अनुकूल राहणार आहे. तुमच्या खर्चांमध्ये कमी येईल ज्यामुळे तुम्ही बचत करू शकता. कुटुंबीयांची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात देखील वेळ अनुकूल आहे. आरोग्य सामान्य राहणार आहे.  
 
कन्या : कन्या राशीच्या जातकांना या वेळेस आपल्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे.    यश मिळवण्यासाठी तुम्हाला आळशीपणा सोडावा लागणार आहे. रोमँटिक लाईफ चांगली राहणार आहे. जोडीदाराचा पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला धनलाभाची संधी मिळेल.  
 
तुला : तुला राशीच्या जातकांसाठी सौभाग्यशाली वेळेची सुरुवात होऊ शकते. पण फक्त भाग्याच्या भरवशावर बसू नये. भाग्याचा साथ तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही मेहनत कराल. लव्ह लाईफमध्ये पार्टनरचा साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.  
 
वृश्चिक : या राशीच्या जातकांसाठी दांपत्य जीवनात थोडे चढ उतार येण्याची शक्यता आहे. तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडे काळजीत असू शकता. मानसिकरीत्या देखील तुमच्यावर दाब राहण्याची शक्यता आहे. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक शांतीसाठी तुम्हाला ध्यान आणि योगाचा साथ घ्यायला पाहिजे. तुम्हाला निर्णय घेताना सुचणार नाही आणि तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकत.   
 
धनू : या गोचरामुळे तुमच्या जोडीदाराच्या इच्छाशक्तीवर प्रभाव पडू शकतो. असे ही होऊ शकत की तुम्हाला त्याचा साथ मिळणार नाही. कामाच्या क्षेत्रात स्थिती सामान्य राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील.  
 
मकर : मकर राशीच्या जातकांनी सावधगिरी बाळगावी. तुमच्या शत्रूंची सख्या वाढू शकते. तुम्हाला मुलांच्या भवितव्याची काळजी राहील. धनप्रवाह हळू होईल. कार्यक्षेत्रात फोकस करण्याची गरज आहे. लोकांना तुमच्यातील चुका काढण्याची संधी देऊ नका. 
 
कुंभ : या राशीच्या लोकांना नाव आणि प्रसिद्धी मिळू शकते. धनलाभाचे संकेत मिळत आहे. तुम्ही स्वत:ला एका राजाप्रमाणे समजू शकता. तुम्ही जास्त मिळवण्याची अपेक्षा कराल. या दरम्यान तुम्ही थोडी मेहनत करून जास्त लाभ कमावू शकता. रोमँटिक लाईफ चांगली राहणार आहे. 
 
मीन : तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही बर्‍याच वेळेपासून वाहन विक्रीचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल पण अपेक्षांपेक्षा कमी होईल. प्रवास करू नये. जर करणे गरजेचे असेल तर सावधगिरी बाळगा. 

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments