Dharma Sangrah

कॉफीमुळे वाढू शकतो मुलांमध्ये लठ्ठपणा

Webdunia
गर्भावस्थेदरम्यान कॉफीचे जास्त सेवन करणार्‍या महिलांनी सावध होण्याची गरज आहे. कॉफीसेवनाची ही सवय त्यांच्या होणार्‍या बाळाच्या आरोग्याला भारी ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्‍या महिलांच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार गर्भावस्थेदरम्यान दररोज एक वा दोन कप कॉफीसुद्धा होणार्‍या मुलाच्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकते. अशा महिलांची मुले शाळेत जाण्याच्या वयातच लठ्ठपणाची शिकार ठरू शकतात. स्वीडनमधील गोटेनवर्ग विद्यापीठातील सहायक प्राध्यापक वेरेना सेंगपील यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, दररोज तीन कप कॉफी पिण्याच्या सल्ल्यावर प्रतिबंध लावण्याचे हे उत्तम कारण ठरू शकते. अर्थात कॅफीन आणि लठ्ठपणा यांच्यादरम्यान थेट संबंध असल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेली नाही. या अध्ययनात 250 गर्भवती महिलांचा समावेश करण्यात आला होता. गर्भावस्थेत कॉफीचे सेवन करणार्‍या या महिलांची मुले आठ वर्षांची होईपर्यंत त्यांचे अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा अगदी हॉटेलसारखी क्रीमी आणि किंचित गोड मेथी मटर मलाई रेसिपी

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

केसांच्या समस्येवर कांद्याचे पाणी उकळून लावण्याचे फायदे जाणून घ्या

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो दुर्लक्षित करू नका

पुढील लेख
Show comments