Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यायाम गरजेपेक्षा जास्त करत आहात, जाणून घ्या दुष्परिणाम

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (07:00 IST)
ज्यास्त व्यायाम केल्याने अशक्तपणा आणि थकवा येतो. सोबत झोप आणि भुकेची समस्या येऊ शकते. जास्त व्यायाम केल्याने स्नायू आणि सांध्यांचे दुखणे वाढू शकते. 
 
Overdoing Exercise : व्यायाम हा एक सुरक्षित आणि फायदेशीर व्यायाम आहे. पण गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने दुष्परिणामांचे काही संकेत दिसायला लागतात. त्यांना ओळखणे महत्वपूर्ण आहे म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक व्यायाम कराल आणि होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकाल. 
 
*गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याचे संकेत- 
नियमित थकवा आणि अशक्तपणा, स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये दुखणे तसेच झोपेची समस्या, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे, दुखणे वाढणे. 
 
1. स्नायू आणि सांध्यांचे दुखणे- गरजेपेक्षा जास्त व्यायाममुळे स्नायूंमध्ये तणाव, लचक भरणे या समस्या निर्माण होऊ शकतात. हे सांध्यांमध्ये दुखणे आणि सुजणे याचे देखील कारण बनू शकते. 
 
2. तणाव फ्रॅक्चर- गरजेपेक्षा जास्त व्यायाममुळे तणाव फ्रॅक्चर होऊ शकते. हे फ्रॅक्चर गंभीर दुखणे आणि नुकसानचे कारण बानू शकते.  
 
3.अति प्रएक्सरसाइज सिंड्रोम- गरजेपेक्षा जास्त व्यायाम मुळे अति प्रएक्सरसाइज सिंड्रोम हा आजार होऊ शकतो. जी एक अशी स्थिती असून ही तेव्हा होते जेव्हा स्नायूंचे टेंडन किंवा सांध्यांवर वारंवार दबाव येऊन व्यायाममुळे अराम करण्याची वेळ येत नसेल. हे दुखणे, सुजणे या नुकसानांचे कारण बानू शकते. 
 
4. हृदयाची संबंधित समस्या- गरजेपेक्षा जास्त व्यायामामुळे हृदयाशी संबंधीत समस्या येऊ शकतात. असे होऊ शकते की, हृदयाच्या गतीमध्ये वाढ आणि रक्तचाप मध्ये वाढ होऊ शकते. 
 
5. तंत्रिका क्षति- गरजेपेक्षा जास्त व्यायाममुळे तंत्रिका क्षति होऊ शकते. ज्यामुळे दुखणे, मुंग्या येणे आणि अशक्तपणा येऊ शकतो. 
 
6. मानसिक आरोग्याच्या समस्या- गरजेपेक्षा जास्त व्यायाम मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो.  
 
*गरजेपेक्षा जास्त व्यायाम पासून कसे दूर राहावे- 
1. हळू हळू व्यायाम करा व गती हळू हळू वाढावा- 
जास्त कठीण किंवा अचानकपणे व्यायाम सुरु करू नका. तुमच्या शरीराला हळू हळू सवय होऊ द्या. तसेच वेळेनुसार गती वाढवा. 
 
2. आपल्या शरीराला ओळखा- जर तुम्ही दुखणे आणि असुविधा यांची जाणीव स्वतःला करत आहात तर थांबून जा व अराम करा. 
 
3. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा अभ्यास करा- केवळ एकच प्रकारच्या व्यायामाचा अभ्यास केल्याने तुमच्या शरीरातील काही भागांवर प्रभाव पडू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा अभ्यास केल्याने तुमचे शरीर संतुलित राहण्यास मदत होते. 
 
4. ब्रेक घ्या- शरीराला अराम देणे महत्वपूर्ण असते. आठवड्यात कमीत कमी एक दिवस व्यायाम न करता शरीराला अराम द्या. 
 
5. ट्रेनरचे मार्गदर्शन घ्या- ट्रेनर तुम्हाला सुरक्षित आणि चांगल्याप्रकारे व्यायाम करायला मदत करेल. ते तुमच्यासाठी एक व्यक्तिगत अभ्यास योजना विकसित करू शकतात. 
 
व्यायाम एक फायदेशीर अभ्यास आहे, पण गरजेपेक्षा ज्यास्त व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. गरजेपेक्षा जास्त व्यायामाचे संकेत आणि दुष्परिणाम ओळखणे महत्वपूर्ण आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करून कुठल्याही नकारात्मक परिणामांपासून वाचू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments