Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते

Webdunia
मंगळवार, 30 जून 2020 (13:02 IST)
पूर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तो ही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा ! 
आग्रह करताना सांगितले जायचे, "शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! " 
मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! 
 
आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ? 
यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक शास्त्रीय कारण आहे ! 
पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !

मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ?
दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणते शास्त्र ?
आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात. व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.
 
जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?
 
दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.
मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. 
 
ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.
 
आता असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे?
 याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात......
 
दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. पुर्वी दही भात आर्वजून खाला जात असे. 
 
जाणून घेऊया दही भात खाण्याचे फायदे-
वजन कमी होते
दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते, कॅलरीज घटतात.
 
तापावर फायदेशीर
ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. दह्यामुळे इम्मुनिटी वाढते. 
 
पोट बिघडल्यावर
पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.
 
बद्धकोष्ठतेवर परिणामकारक
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 
तणावमुक्ती
दही भात खाल्याने तणाव कमी होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments