Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांचा आहार कसा असावा....?

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (16:43 IST)
आजचा काळात आई-वडील दोघेही कामकाजी असून कुटुंब देखील सीमित झाले आहे. आई-वडील आणि त्यांची मुलं. अश्या स्थितीत जिथे घरात मुलांकडे लक्ष देणारे कोणीच नसते. त्यामुळे मुलांच्या जेवणाची आभाळ होऊ लागते. जेवणाची आवड निवड जास्त व्हायला लागते. किंवा मुले जेवण्याचा कंटाळा करू लागतात. खाण्याचा त्रासाने हतबळ झालेले आई-वडील मुलांना बाहेरचे खाऊ घालणे जास्त पसंत करतात ज्यामुळे मुलांना बाहेरचे पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, आइसक्रीम, चिप्स आवडू लागतात. अशाने त्यांना चांगले पोषक आहार मिळत नसल्याने ते वारं-वारं आजारी पडतात. त्यांची शारीरिक, मानसिक वाढ कुंठते. लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी त्यांना पोषक आहाराची गरज असते. त्यांचा सर्वांगीण विकासासाठी समतोल आणि संतुलित आहार गरजेचे असते. आपली मुलं सर्व ठिकाणी पुढे असणे अशी पालकांची इच्छा असते. अश्या वेळी त्यांना योग्य आहार मिळाला नाही तर त्यांचा आरोग्यांवर दुष्परिणाम होतो. लहान मुलांच्या आवडी -निवडी खूप असतात. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळाले नाही तर ते जेवायला कंटाळा करतात. त्यांना खाऊ घालणे हे कठीण होते. त्यासाठी आई ने काही आहारपद्धतीचा वापर करायला हवा.
  
मुलांच्या योग्य वाढीसाठी दिवसांतून 3 - 4 वेळा खायला हवे. सकाळी नाश्ता, मग दुपारचे संतुलित आहाराचे जेवण, संध्याकाळी काही स्नेक्स आणि रात्रीचे हलके जेवण. अश्या प्रकारे नियोजन करून आपण आपल्या मुलाच्या आहार कडे लक्ष देऊ शकता.
webdunia
मुलांच्या  दररोजच्या जेवणात सगळे पदार्थ - पोळी, भाजी, वरण-भात, कोशिंबीर, सॅलडचा समावेश असला पाहिजे. मुलांना आठवड्यातील साही दिवस पौष्टिक आहार दिले पाहिजे.
 
आपल्याकडे सण-वार इतके असतात, त्यामुळे मुलांना आपल्या संस्कृती आणि त्याच्याशी निगडित जेवणाच्या पद्धती आणि प्रकार कळायला पाहिजे त्याचप्रमाणे हे सगळे पदार्थ मुलांना खाऊ घालायला हवे. 
 
रात्रीचे जेवण हलके आणि सुपाच्य असले पाहिजे. रात्रीच्या जेवणात विविधता असायला हवी. पचायला सोपे असले पाहिजे. खिचडी, मऊ भात, वरण, भाजी, पोळी असे पदार्थ हवे.
 
रोजच्या जेवणात तूप द्यायला पाहिजे. तूप स्निग्ध असल्याने शरीरास गरजेचे असते. दर रविवारी मुलांच्या आवडीचे पदार्थ करावे. त्यामध्ये पण पौष्टिक आहाराचा समावेश पाहिजे. पदार्थ बाहेरचे नको तर घरात बनवलेले असावे.
webdunia
बाहेरचे जंक फूड पिझ्झा, पास्ता, बर्गर, नूडल्स देणे कटाक्षाने टाळावे तसेच कोल्ड ड्रिंक(शीत पेय) देणेसुद्धा टाळावे.
 
मुलांना आठवड्यातून एकदाच बाहेर जेवायला घेऊन जायला पाहिजे. पण त्यात जंक फूडचा समावेश नसावा.
 
वरील दिलेले पथ्य पाळले तरच आपण आपल्या मुलांचे आरोग्यास चांगले ठेवू शकता आणि मुलांना सगळं खायची सवय लागेल व त्यांची शारीरिक, मानसिक वाढ उत्तमरीत्या होऊ शकते.

Share this Story:
  • facebook
  • twitter
  • whatsapp

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
केवळ अर्धा टोमॅटो आपल्या चेहर्‍याची चमक वाढवेल