Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऍसिडिटी किंवा सौम्य हृदयविकाराचा झटका यात फरक कसा करावा

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (09:20 IST)
आजच्या काळात अ‍ॅसिडिटीची समस्या सामान्य झाली आहे. परंतु यासह, एक मोठा आजार देखील जन्म घेत आहे, हा एक सौम्य  हृदयविकाराचा झटका आहे. होय, हे दोन्ही रोग गंभीर रोग आहेत. आपण हा रोग समजून घेतल्यास आणि योग्य उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो, अन्यथा काही गंभीर आजार होऊ शकतो. उदाहरणार्थ,ऍसिडिटी अधिक झाल्यावर रक्तदाब देखील वाढू शकतो. सौम्य हृदयविकाराचा झटका हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. दोघांमध्ये फरक कसा करावा, याची लक्षणे कोणती आहेत, आहारात काय बदल केले पाहिजेत. वेबदुनियाने चेस्ट फिजीशियन डॉ. रवी दोसी यांच्याशी या सामान्य दिसणार्‍या आजाराबद्दल विशेष चर्चा केली. चला काय ते जाणून घेऊया?
 
ऍसिडिटी आणि सौम्य हृदयविकाराचा झटका यात फरक कसा करावा?
पोटात जास्त प्रमाणात आम्ल असल्यामुळे ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटीमुळे पोटात वेदना आणि जळजळ होते. हृदयविकाराच्या झटक्यात, हृदयाची एक रक्तवाहिनी ब्लॉक होते, ज्यामुळे रक्त गोठतो आणि रक्तपुरवठा थांबतो आणि वेदना सुरू होते. हे दोघेही वेगवेगळे आहेत, दोघांवरही पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीनेउपचार दिले जाते.
 
ऍसिडिटी आणि सौम्य हृदयविकाराचा झटक्याची लक्षणे
ऍसिडिटी असल्यावर छातीच्या मध्यभागी वेदना जाणवते,ढेकर येतात,अपचनाची समस्या होते,पोट साफ होत नाही.
हृदयविकाराच्या वेळी, एखाद्या व्यक्तीस उलट बाजूने वेदना जाणवते. वेदना अशी असते की संपूर्ण हाताला मुंग्या येतात. या वेळी, घाम  देखील येतो आणि छातीत दुखणे उद्भवते.
 
आहारात बदल
ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मसालेदार अन्न खाऊ नये. तळलेले पदार्थ खाऊ नयेत. हृदयविकाराच्या रूग्णांनी तळलेल्या आणि चरबी वाढविणार्‍या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण जास्त तेल खाल्ल्यामुळे रक्त घट्ट होते.
 
हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण व्यायाम करू शकतात का?
हृदयविकाराचे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम आणि योग केले पाहिजेत. केवळ काही प्रमाणात हे करू शकतात . तथापि, प्रथम त्यांचे हृदय किती आणि कसे कार्य करीत आहे हे जाणून घ्यावे. जर हृदयाचे कार्य चांगले असेल तर ते व्यायाम करू शकतात आणि जर हृदयावर वाईट प्रभाव पडला असल्यास तर व्यायाम करणे त्यांच्या साठी घातक ठरू शकते.
 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

पुढील लेख
Show comments